कोरोनामुळे सलुन व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ ; शासनाने योग्य त्या प्रकारे मदतीचा हात देणे गरजेचे

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

     विवरे ता रावेर(संजय मानकरे)      कोरोनाचा प्रादुर्भाव  आणि लॉक डाऊनमुळे जवळजवळ दीड वर्षो पासून अनेक व्यवसाय ठप्प झाले आहेत अशातच गेली दीड वर्षो पासून दुकान भाडे घरभाडे,विज बिल अशा विविध कर्जाचे हप्ते भरून शकल्याने सलुन व्यवसाय करणारे महाराष्ट्रातील नाभीक बाांधव दुकाने सुरू होऊन देखील ' आज आर्थिक आणि मानसिक विवंचनेत  आहे.


          सरकारला वारंवार निवेदन देऊन देखील कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद न मिळाल्यामुळे सलुन व्यवसायिक आज हलाखीचे जीवन जगत आहेत.

सरकारने आज लॉक डाऊनमध्ये जरी शिथिलता आणून सलुन दुकान उघडन्यास जरी परवानगी दिली असली तरी कोरोनाच्या भीतीने दुरावलेल्या ग्राहकाला पुन्हा सलुन कडे वळवणे हे सर्वात मोठे आव्हान समस्त सलुन व्यवसायीका समोर आहे त्यातून वेळेचे बंधन आणी किचकट नियमामुळे व्यवसाय करने कठीण होऊन बसले परिणामी दुकाने सुरु होऊनदेखील ग्राहक अभावी सलुन व्यवसायाचिक बांधवांची फटफट होताना सर्वत्र दिसून येत आहे

      कोरोनाच्या लॉक डाऊनच्या काळात संपूर्ण सलुन व्यवसायीकांचा पुरता होरपळून निघाला आहे. सलुन व्यवसाय हेच एकमेव उत्पन्नाचे साधन असल्याने आर्थिक समस्याना कंटाळून जवळ जवळ २o बा धवानी आत्मह्त्या सारखे टोकाचे पाऊल उचलुन आपली जीवनयात्रा संपविली आहे 

      आजही सर्वच सलुन व्यवसायिक स्वतःच्या जीवावर उदार होऊन आपला व्यवसाय करीत आहेत. वाढती  महागाई कौटुबीक आणि वैद्यकीय खर्च घर आणी दुकान भांडे विजबिल . विविध बैकच्या कर्जाचे हप्ते या काळजीने उदरनिर्वाह कसा करायचा या चिंतेने ग्रासले आहे जिल्हानिहाय कोरोना ची परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने नियमात शिथिलता आणली तरी कोरोनाचे सावट अद्याप संपलेली नाही हीच भीती ग्राहक वर्गात प्रश्न मनात असल्याने सलुन व्यवसाय ठप्प झाला आहे राष्ट्रीय जनसेवक पक्ष् आणि समाजातील संघटनानी वार वार सरकारला निवेदन देवून देखील सरकारने अद्याप कसलीही दखल घेतलेली नाही त्यामुळे सकल सलुन व्यवसायिक आज आर्थिक कोडित सापडला असून उत्पन्नाचे साधनच बंद पडल्याने समाजावर उपासमाराचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे अशा अवस्थेत आता सरकारी प्रोत्साहानची आणी  आर्थिक मदतीची नितांत गरज आहे कारण याच नाभिक समाजाने राज्याच्या प्रगतीत नेहमीच भरीव योगदान दिलेले आहे समाजविकासासाठी आणि आर्थिक शैक्षणिक परिवर्तनासाठी लवकरात लवकर स लुन व्यवसायीकांना सर्वातोपरी सहकार्य करून पार परिक सलुन व्यवसाय वाचविण्यासाठी आणी व्यवसायीकांची होत असलेली परवड आणि उपासमारी थांबविण्यासाठी शासनाने योग्य त्या प्रकारे मदतीचा हात देणे गरजेचे आहे असे आवाहन सर्व नाभीक समाज्याच्या वतीने करण्यात येत आहे ,

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!