Good Morning Maharashtra : आजच्या ठळक घडामोडी (हेडलाईन्स, 12 जुलै 2021)

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

सुवर्ण दिप 

    हेडलाईन्स, 12 जुलै 2021

 Breaking : हतनूर धरणाचे 16 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले ; तापी नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन | 

✒️ परभणीत 5 तास मुसळधार, हिंगोली, नांदेडमध्ये बैलगाडीसह शेतकरी गेला वाहून, यवतमाळमध्येही मुसळधार पाऊस; पुढील अजून 2 दिवस विदर्भात पावसाची शक्यता


✒️ हल्ल्याच्या तयारीत असलेल्या 'अल कायदा'च्या दोन दहशतवाद्यांना एटीएसनं लखनऊ येथून केली अटक, त्यांच्याकडून कुकर बॉम्ब आणि टाईम बॉम्ब जप्त


✒️ महाराष्ट्रात 1,16,165 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 59,12,479 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 1,25,878 रुग्णांचा मृत्यू


✒️ नवी दिल्ली - दिल्लीतील टिकरी कलां येथील बाजाराला भीषण आग, अग्निशमन दलाचे 26 बंब घटनास्थळी


✒️ उपनिरीक्षकपदाच्या विभागीय परीक्षा रद्दला खात्यातील तरूण पोलिसांचा विरोध; पोलिसांचे मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना साकडे


✒️ पालघर: चिंचणी बीचवर मद्यप्राशन करून धिंगाणा घालत असलेल्या पर्यटकांवर पोलिसांनी कारवाई करायला सुरुवात केली; मात्र मद्यपी पर्यटकांनी पोलिसांवरच केला  हल्ला


✒️ T-20: दुसऱ्या सामन्यात इंग्लंडवर 8 धावांनी विजय मिळवत मालिकेत 1-1 ने बरोबरी; टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करत इंग्लंडसमोर 149 धावांचं ठेवलं होतं लक्ष्य 


✒️ मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात रस्त्यावर माती आल्याने वाहतूक ठप्प


✒️ भारतात 4,45,673 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 3,00,07,200 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 4,08,792 रुग्णांचा मृत्यू


✒️ Wimbledon 2021: नोवोक जोकोविचने रचला इतिहास, बेरेटीनीचा पराभव करून 20 व्या ग्रँड स्लॅमवर कोरलं नाव


✒️ भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीसांची बैठक; नाराज पंकजा मुंडेंनी घेतली मोदींची भेट, सरचिटणीसांच्या सहा तास मॅरेथॉन बैठका


✒️ मुंबई: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांची प्रकृतीत सुधारणा; केवळ कुटुंबातील सदस्यांनाच थोडा वेळ भेटीची परवानगी 


#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!