सुवर्ण दिप
हेडलाईन्स, 13 जुलै 2021
✒️ उत्तर प्रदेश, राजस्थान व मध्य प्रदेशसह इतर राज्यांमध्ये वीज कोसळून 78 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींकडून मृतांच्या कुटुंबियांना 2 लाख तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा
✒️ 12 सप्टेंबरला कोविड प्रोटोकॉल पाळून 'नीट'ची (NEET) परीक्षा होणार, आज सायंकाळी 5 वाजल्यापासून NTA च्या वेबसाईटवर अर्जप्रक्रिया सुरु होणार
✒️ पंजाब नॅशनल बँकेची 13500 कोटींची फसवणूक करणाऱ्या मेहुल चोक्सीला डोमिनिका हायकोर्टाकडून जामीन मंजूर, उपचारासाठी अँटिग्वाला जाण्याची परवानगी
✒️ ईडीच्या रडारवर महाराष्ट्रातील 40 साखर कारखाने, नियम डावलून कर्ज दिल्याने चौकशी होण्याची शक्यता
✒️ महाराष्ट्रात 1,08,343 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 59,27,756 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 1,26,024 रुग्णांचा मृत्यू
✒️ नाशिक शहरात पुढील आठवड्यापासून पाणी कपातीची शक्यता, दर बुधवारी शहरात कोरडा दिवस पाळला जाणार; गंगापूर धरणात 40 दिवस पुरेल इतका पाणीसाठा
✒️ काँग्रेस नेत्यांची आज मुंबईत बैठक: बैठकीत नाना पटोले यांचे वादग्रस्त वक्तव्य, विधानसभा अध्यक्ष आणि संघटनात्मक कामावर होणार चर्चा
✒️ भारतात 4,25,539 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 3,00,56,130 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 4,10,816 रुग्णांचा मृत्यू
✒️ पेट्रोल महागले तर काय झाले? सुविधा मिळाल्या, लस मोफत मिळतेय; इंधन दरवाढीवर खासदार सुजय विखेंचा अजब युक्तिवाद
✒️ कोरोनाची तिसरी लाट जवळ, पर्यटन आणि धार्मिक यात्रेला आणखी काही महिने थांबवले जाऊ शकते; कोरोनावर मेडिकल असोसिएशनचं मत
✒️ मुंबई: लोकल सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्री सकारात्मक; विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची माहिती
✒️ नेदरलँड: जगातील सर्वात महागडा बर्गर, किंमत फक्त 4.5 लाख रुपये; 'डी डॉलटन्स' या फूड आऊटलेटने जगातील सर्वात महागडा बर्गर विक्रीस ठेवला
✒️ गायक राहुल वैद्य आणि दिशा परमार 16 जुलै रोजी होणार विवाहबद्ध; लग्नसोहळ्यामध्ये 50 वऱ्हाडी होणार सहभागी


