राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या पोलीस दलातील भरतीबाबत मोठी घोषणा केली आहे.
ℹ️ काय म्हणाले गृहमंत्री? :
▪️ महाराष्ट्र पोलीस दलात एकूण 12 हजार 200 पदांची भरती केली जाणार असून, पहिल्या टप्प्यातील 5,200 पदांची भरती या वर्षाअखेरीस 31 डिसेंबर पूर्वी केली जाईल, अशी मोठी घोषणा त्यांनी यावेळी केली आहे.
▪️ तर त्यानंतरच्या दुसऱ्या टप्प्यात उर्वरित 7 हजार पदांची पोलिसांची भरती करण्यात येईल अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
📍 दरम्यान, पोलीस दलातील भरतीसोबतच कोविडमध्ये मृत पोलिसांच्या मुलांना नोकरी देण्याचे धोरण हि गृहमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.


