Good Morning Maharashtra : आजच्या ठळक घडामोडी (हेडलाईन्स, 15 जुलै 2021)

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 सुवर्ण दिप 

    हेडलाईन्स, 15 जुलै 2021

✒️ राज्यात कोणतेही निर्बंध शिथिल केले जाणार नाहीत, तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत सरकारचा निर्णय; कोरोना लसीचे 2 डोस घेतलेल्यांनाच आता राज्यात प्रवेश


 ✒️ बनावट देयके सादर करून 213.67 कोटी रुपयांचा परतावा मिळविणाऱ्या जीएसटी विभागाच्या नागपूर झोनल युनिटने उत्तर प्रदेशमधून एकाला केली अटक 


✒️ महाराष्ट्रात 1,06,764 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 59,44,801 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 1,26,390 रुग्णांचा मृत्यू


✒️ आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय आता 62 वर्षांपर्यंत वाढवण्याला मान्यता; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय


✒️ झोमॅटो IPO: काल पहिल्याच दिवशी झोमॅटो आयपीओला चांगला प्रतिसाद, इश्यू 1.05 पट आणि किरकोळ गुंतवणूकदारांचा वाटा 2.69 पट भरला


✒️ महागाई व इंधन दरवाढीच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक; काँग्रेस नेत्यांचे शिष्टमंडळ आज राज्यपालांना भेटणार हँगिंग गार्डनपासून सायकलने राजभवनावर जाणार नेते


✒️ पल्स ऑक्सीमीटर आणि थर्मामीटरसह 5 आवश्यक उपकरणांचे भाव होणार कमी, 70% नफ्याची लिमिट ठरली; 20 जुलैपासून लागू होणार नव्या किंमती


✒️ सर्व जिल्ह्यांच्या निर्देशिका मराठीतून प्रकाशित करण्याच्या सूचना, नागरिक व स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची सोय होणार; मराठी भाषेच्या वापराच्या तक्रारीची अमित देशमुख यांनी घेतली दखल 


✒️ भारतात 4,26,028 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 3,01,36,483 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 4,12,019 रुग्णांचा मृत्यू


✒️ राज्य मंत्रिमंडळाची साहसी पर्यटन धोरणास मान्यता, लवकरच नियमावली आणि गाइडलाइन्स जाहीर होणार; मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितला मेगाप्लान


✒️ उद्धव ठाकरे ठरले सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री; देशातील प्रमुख 13 राज्यांत घेण्यात आले सर्वेक्षण, सर्वेक्षणात ठाकरेंबाबत 49 टक्के मते सकारात्मक


✒️ भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा पत्रकारांशी संवाद, दिल्लीतील विरोधकांच्या मोर्चेबांधणीवर दिली प्रतिक्रिया - आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा जिंकेल

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!