वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या महिला वायरमनला महिले कडून मारहाण

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 रावेर प्रतिनिधी (राजेंद्र अटकाळे)

 रावेर तालुक्यातील वाघोदा बुद्रुक येथे थकीत वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या महिला वायरमनला एका महिलेनेच मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली.

   या बाबत मिळालेली माहिती अशी की, मोठे वाघोदा येथे सविता विलास बोंडे या, वीज वितरण कंपनीत (वरिष्ठ तंत्रज्ञ) वायरमन म्हणून कार्यरत असून त्या काल वाघोदा बुद्रुक येथील गयाबाई बन्सी वाघ या महिलेचे थकीत असलेले वीज बिल वसुल करण्यासाठी आपल्या सहकार्‍यांसोबत गेल्या असता त्या महिलेने बील न भरल्यामुळे या पथकाने तिची वीज जोडणी कट करण्याचे ठरविले. या वेळी गयाबाई वाघ यांनी सविता बोंडे यांना चापट-बुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ करून धमकावले.या वरून सविता बोंडे यांनी सावदा पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्याने गयाबाई बन्सी वाघ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस निरिक्षक देविदास इंगोले याच्या मार्गदर्शना खाली उपनिरिक्षक आर.डी. पवार, हेड कॉ विनोद बळीराम पाटील हे करीत आहेत.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!