Good Morning Maharashtra : आजच्या ठळक घडामोडी (हेडलाईन्स, 18 जुलै 2021)

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 सुवर्ण दिप 

    हेडलाईन्स, 18 जुलै 2021

✒️भारतीय नौदलाच्या ताफ्यात ‘एमएच-60 आर’ प्रकारातील दोन हेलिकॉप्टर दाखल होणार, सेन्सरच्या साहाय्याने पाणबुड्यांचा शोध घेण्याची ताकद  


✒️ राज्य सरकारने राज्यातील 10 मानाच्या पालख्यांचा सोहळा बसमधून पंढरपूरपर्यंत नेण्याचा घेतला निर्णय, सोमवारी शिवशाही बस पंढरपूरकडे होणार रवाना 


✒️दहावीचा निकाल घोषित करताना उद्भवलेल्या त्रुटीची होणार चौकशी, महाराष्ट्र शासनाचे सहसचिव राजेंद्र पवार यांनी दिले आदेश


✒️ महाराष्ट्रात 1,00,429 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 59,74,594 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 1,26,851 रुग्णांचा मृत्यू


✒️ अभिनेता मनोज वाजपेयी आता थ्रिलर फिल्म 'डायल 100' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार; हा चित्रपट येत्या  ऑगस्टमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्म झी 5 वर रिलीज होणार


✒️ पुणे: पुण्यातील खेड तालुक्यातील मुलीला घरातून पळवण्याच्या आरोपात 2 जणांची हत्या, तरुणीला अमानुष मारहाण; 9 जणांना अटक


✒️ बिहार: सचिन तेंडूलकरचा चाहता सुधीर कुमार मुजफ्फरपूरमध्ये बनवणार सचिन तेंडूलकरचे मंदिर; म्हणाला-'देणगी घेणार नाही, स्वतःच्या पैशांनी बनवणार'


✒️ अहमदनगर: शिर्डी-म्हैसूर साप्ताहिक विशेष रेल्वे 26 जुलैपासून सुरू होणार, दर सोमवारी धावणार गाडी


✒️ भारतात 4,17,058 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 3,02,62,233 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 4,13,640 रुग्णांचा मृत्यू


✒️ भारतीय क्रिकेटर शिवम दुबेनं शुक्रवारी आपली मैत्रिण अंजुम खानसोबत मुंबईमध्ये केलं लग्न; त्यानं स्वत: लग्नाच्या फोटोंसह ट्वीट करत दिली माहिती 


✒️ टी- सीरिजचे भूषण कुमार बलात्काराच्या आरोप प्रकरणात आणखी एक वळण; खंडणी न दिल्याने भूषण कुमार यांना खोट्या आरोप गोवण्यात आल्याचा कंपनीचा दावा 

  

✒️ महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रम आता रविवारी देखील प्रसारित होणार, हास्यजत्रा कार्यक्रमाच्या पहिल्या भागात जॉनी लीवर आहेत परीक्षक 

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!