साप्ताहिक सुवर्ण दिप
हेडलाईन्स, 20 जुलै 2021
✒️ अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक, अश्लील चित्रपटांची निर्मिती करणे आणि ते प्रदर्शित करण्याच्या आरोपाखाली अटक
✒️ अहमदनगर: ‘हनीट्रॅप‘ प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी एका महिलेसह दोघांना अटक, एक आरोपी फरार; आज न्यायालयात हजर केलं जाणार
✒️ औषधी, प्राणवायू, मनुष्यबळ इ.ची उणीव राहू नये म्हणून राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात 1,250 कोटी रुपये निधी मंजूर; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहीती
✒️ महाराष्ट्रात 96,375 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 59,93,401 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 1,27,097 रुग्णांचा मृत्यू
✒️ भारतात 3,99,998 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 3,03,46,131 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 4,14,513 रुग्णांचा मृत्यू
✒️ बरांजच्या 2018 पूर्वी बेपत्ता साडेचार लाख टन कोळसा चोरीसंदर्भात प्रशासनाने तात्काळ चौकशी करावी- मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचे आदेश
✒️ कोरोना सोडून इतर आजारांसाठी शुल्क निश्चितीचा अधिकार राज्य सरकारला नाही; सर्वोच्च न्यायालयाची माहीती
✒️ अधिवेशनाच्या एक दिवस आधी पेगॅससचा रिपोर्ट येणं योगायोग तर नाही; आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केली शंका
✒️ देवमाणूस मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; देवमाणूसच्या जागी नवीन मालिका ‘ती परत आलीये, मालिकेचे प्रोमो रिलीज