मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वन रक्षक मोनिका चौधरी यांना राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचा (NTCA) वाघ रक्षक पुरस्कार जाहीर....

अनामित
मेळघाट (वार्ताहर) मोनिका चौधरी वय 31 वर्ष. योगा शास्त्र या विषयामध्ये M. A. केले आहे. 2011 ला वन विभागामध्ये रुजू झाल्या आहेत. अत्यतं दुर्गम असलेल्या धूळघाट क्षेत्रात कार्य केल्यानंतर संध्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील मेळघाट वन्यजीव विभागातील दुर्गम जामली वन परिक्षेत्रातील गिरुगुटी या डोंगर नियत क्षेत्रात कार्यरत आहे.या क्षेत्रात काम करतांना त्यांनी गीरगुटी गावामध्ये असलेल्या संयुक्त वन व्यवस्थापन समिती व गावकरी यांना सोबत घेऊन वन संरक्षण व संवर्धन संबंधित उत्तम कार्य केली आहे.
[ads id='ads1]
यामध्ये 100 टक्के LPG गॅस वाटप करून जंगलातील तोड लोक सहभागातून पूर्णपणे बंद केली आहे. या वन्यजीव क्षेत्रात असलेले 35 हेक्टर अतिक्रमण सुद्धा स्थानिक लोकांना सोबत घेऊन काढले आहे हे विशेष व सदर क्षेत्रात वन्यजीवांची रेलचेल आता दिसून येते. याशिवाय या गावामध्ये वन्यजीवांसाठी कुरण विकासाचे ही उत्तम कार्य करून वनातील प्राण्यांना संजवीनी दिली आणि याचाप्रत्यक्ष, अप्रत्यक्ष फायदा म्हणजे मानव प्राणी संघर्ष कमी होण्यासाठी झाला आहे. 

लोकसहभाग व संयुक्त वन व्यवस्थापन समितीला सोबत घेऊन गावातील सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी 100 टक्के शोष खडडे करून पाणी गावातच वळते केले आणि जल प्रदूषण पूर्णपणे कमी झाले, त्याचा फायदा गावकऱ्याच्या आरोग्याला, पर्यावरणाला तसेच वनाला व वन्यजीवांना सुद्धा झाला. या व्यतिरिक्त 35 हेक्टर क्षेत्रात समतल चरच्या माध्यमातून मृदा संधारणची कामे सुद्धा उत्तम रित्या पार पाडली व यामार्फत स्थानिकांना रोजगार सुद्धा उपलब्ध करून दिला आहे.

या गावामध्ये मोह वृक्षाची नर्सरी तयार करून 10000 रोपे गावातील लोकांना त्यांच्या शेतामध्ये लावण्याकरिता दिले, ज्यामधून भविष्यात त्यांना उत्पादन प्राप्त होईल.
तसेच वाघाच्या व वन्यजीवंचा अधिवास समजनू घेण्यासाठी जंगलामध्ये प्रेशर इम्प्रेशन पॅड तयार केले. नियमित वन गस्ती करून M stripe चा साहाय्याने 2020/21 साधारणत: 2664 किमी पैदल गस्त केली व वन्यजीवांची अभ्यास पूर्ण माहिती संकलित केली. 

मेळघाट व्याघ्र प्रकल्पा मार्फत आयोजती लोकसभागातून अंगार मुक्त अभियान स्पर्धेत सुद्धा हिरारीने भाग घेऊन गावाला बक्षीस प्राप्त करून दिले, गावा नजीकच्या वणाला वनवा लागू दिला नाही. गेल्या दोन वर्षामध्ये बिट क्षेत्रात एकदाही अवैध प्रकार होऊ दिले नाहीत. यामागील कारण असे कि, नियमित गावामध्ये वनाविषयी जण जागृती करण्याच, सर्व माहिती समजून सांगणे, लोकांशी उत्तम संवाद साधून वनाचे व वन्यजीवांचे महत्व समजून सांगणे.

असे वैविध्य पूर्ण कामगिरी मोनिका चौधरी यांनी केली व वने व वन्यजीवांचे संवर्धन वर संरक्षणासाठी नेहिमी तत्पर राहिल्यात, त्यांच्या या कर्तव्य दक्ष कामगिरी करिता त्यांना 2021 च्या मनाचा असणारा राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणामार्फत देण्यात येत असलेला बाघ मित्र पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे, या पुरस्करामध्ये मानचिन्ह व 1लाख रुपये बक्षीस असे स्वरूप आहे.

हा बाघ रक्षक पुरस्कार वनरक्षक मोनिका चौधरी यांना प्राप्त झाल्यानंतर मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या मुख्य वन संरक्षक तथा क्षेत्र संचालिका सुश्री. जयोति बॅनर्जी यांनी त्यांच्या कर्तृत्वाबद्दल कौतुक व अभिनंदन केले तसेच मेळघाट वन्यजीव विभागाच्या विभागीय वन अधिकारी श्रीमती पियुषा जगताप यांनी सुद्धा अभिनंदन करून कौतुकाने पाठ थोपटली वर पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्यात या शिवाय सर्व वन अधिकारी, कर्मचारी सुद्धा यांनी त्यांचे अभिनंदन केले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!