निंभोरा बु. वार्ताहर (प्रमोद कोंडे) पालकांच्या फी विषयी तक्रारीनुसार स्वामी विवेकानंद इंग्लिश मेडियम स्कुल निंभोरा बु. येथे दि.२९/०७/२१. गुरुवार रोजी केंद्र प्रमुख सौ.रागिणी प्रकाश लांडगे चौकशी साठी आल्या त्यावेळेस पालक संतोष लोंढे, संजय गणपत सोनवणे, अशोक बोरोले, रामेश्वर धामोडकर , गजेंद्र भाऊराव सोनवणे,शरद भोई तसेच तक्रारदार , अर्जदार शरद पितांबर तायडे हे हजर होते कोविड १९ . नियमानूसार शैक्षणिक वर्ष २०२१/२०२२ करिता शाळा प्रशासनाने करावयाच्या कार्यवाही बाबत नाशिक शिक्षण उपसंचालक यांनी परिपत्रक नियमावली ठरविली आहे त्याचे उल्लंघन या शाळेने केले आहे.
[ads id='ads1]
देणगी फी, बिल्डिंग फंड, शाळा सोडताना पाचशे रु.पालकांकडून घेण्यात आले, पावत्या ही वेगवेगळ्या देण्यात आल्या काही पालकांना ट्युशन फी ३००, कॉम्पुटर फी १००, बिल्डिंग फंड १००, अशा पावत्या देण्यात आल्या.
तसेच पावती मध्ये ताळमेळ बसत नाही. ऑनलाईन शिक्षण, नुसते नावाला,एक ही वेळेस देण्यात आले नाही. पालकांना बोलू दिले जात नाही.चौकशीला आलेल्या केंद्र प्रमुखासमोर पालकांना बाहेर काढण्यात आले एकंदरीत मनमानी, आणि एक हाती कारभार या संस्थेचा चालु आहे. बाकी संचालक येऊन ही पाहत नाही. एकाच संचालकाची खाचणे नामक व्यक्तीची मक्तेदारी सुरु आहे.
पालकांची मागणी आहे की सर्व संचालक मंडळांनी एकत्र येऊन पालकांना ही बोलवून मीटिंग घेऊन शाळेचा ताळमेळ बसवावा.शाळेच्या या मनमानी कारभाराला आळा बसला पाहिजे व शाळेच्या संचालकावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि लहान विद्यार्थ्यांचे शालेय नुकसान टाळावे.व पालकांमध्ये शाळेविषयी असलेली नाराजी दूर करण्यात यावी. शिक्षण क्षेत्रात राजकारण करण्यात येऊ नये.
