निंभोरा बु वार्ताहर (प्रमोद कोंडे) निंभोरा गावापासून तर बलवाडी रेल्वे गेट पर्यंत या रस्त्याची दैननिय व्यवस्था झाली होती .या रस्त्यावरून जास्त ट्राफिक वाढल्याने खिर्डी रस्त्यावरील रेल्वे उड्डाणं पुलाच काम सुरु असल्याने जड व मोठी वाहने खिर्डी ऐनपूर कडे जाणारे बलवाडी मार्गे वळविण्यात आली आहेत. हा मार्ग खिर्डी रस्ता बंद करण्याअगोदर या रस्त्याचे कामं सार्वजनिक बांधकाम विभागाने करणे गरजेचे होते.
[ads id='ads1]
रोजची ट्रक द्वारे केळी वाहतूक याच रोड वरून होत असते व हा रस्ता मुक्ताईनगर धरण मार्गे जाण्यासाठी मुख्य असल्यामुळे या रस्त्याचे काम पावसाळा अगोदर करणे गरजेचे होते. अखेर दि.२९/०७/२०२१ रोज गुरुवार पासुन निंभोरा ग्रामपंचायतीने खारवा, बालीश टाकण्याचे काम सुरु केले आहे. निंभोरा बलवाडी रस्ता कधी दुरुस्त होणार या विषयी या वृत्त पत्राने आवाज उठविला होता सामाजिक सेवा ग्रुप चे शोएब खान युनूस खान यांनी या रस्ता दुरुस्ती विषयी निवेदन देऊन व स्वतः पुढाकार घेऊन मागणी केली होती अखेर बालिश, खरवा टाकण्यात येत आहे.
निंभोरा गावालगत अतिशय खराब रस्ता झाला होता. संपूर्ण चिखलमय होऊन रस्त्यात मोठ - मोठे खड्डे पडले होते . साधं पायी चालणे ही कठीण झाले होते ,कसरत करत या रस्त्यावरून चालावे लागे या रस्त्यावरून केळीने भरलेले ट्रक व ट्रॅक्टर दररोज येत-जात असतात रस्ता खराब झाल्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तसेच या रस्त्यावरून रात्री बे-रात्री नागरिक सुद्धा पडलेले आहे , सद्या पावसाळा सुरू झाल्यामुळे हा रस्त्यांची खूपच शौचनीय व दैनंनिय,खराब अवस्था झाली आहे. हा बलवाडी ते निंभोरा गावलगत रोड कधी दुरुस्त होणार ? अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शोएब खान युनुस खान यांनी निंभोरा ग्रामस्थांतर्फे केली होती. अखेर त्यांना यश आले.
सरपंच सचिन महाले,सदस्य युनुस खान शफी खान , दिलशाद शेख ,अकील खाटीक, तसेच ग्रामसेवक गणेश पाटील रस्ता दुरुस्ती ठिकाणी हजर होते.