पाल वार्ताहर (सुरेश पवार)ता रावेर परम पूज्य सद्गुरु संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी आश्रम वृंदावन धाम पाल मध्ये सलाबादाप्रमाने यंदाहि दी:- २३ जुलै रोजी गुरुपौर्णिमा साजरी करण्याचे योजिले होते. परंतु कोरोना महामारी मुळे शासनाच्या निर्देशाचे पालन करीत भाविकांच्या अनुपस्थितित पाल आश्रमाचे विद्यमान गादीपति श्रधेय संत श्री गोपाल चैतन्य जी महाराज व ब्रम्हचारी निवासी संत यांच्या हस्ते पूज्य बापूजी च्या समाधि स्थळी सकाळी गुरुदेवाची पादुका पूजन करण्याचे योजिले असून त्या नंतर लाखो अखिल भारतीय चैतन्य साधक परिवाराला चैतन्य चैनल व यू ट्यूब च्या माध्यमातून ऑनलाइन सत्संग अमृतांचा लाभ गादीपति श्रधेय संत श्री गोपाल चैतन्य जी महाराज यांच्या अमृत वाणीतुन मिळणार असून .यंदाची गुरुपौर्णिमा भाविकानी आपापल्या घरी साजरी करुन या ऑनलाईन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे समिति तर्फे आवाहन करण्यात आले आहे.
भाविकांच्या अनुपस्थितित होणार पाल आश्रमात गुरुपौर्णिमेनिमित्त आज गुरुदेव पादुका पूजन व ऑनलाईन सत्संग
गुरुवार, जुलै २२, २०२१
Tags