'एन एस एस ही योजना नव्हे चळवळ, ज्यात आहे जगण्याचा आनंद अन् जिवनाचा सुगंध'- प्रा. जगदिश संसारे

अनामित
काॅ. गोदावरी परुळेकर महाविद्यालयात रासेयो स्वयंसेवकांसाठी उद्बोधन कार्यक्रमाचे आयोजन
तलासरी वार्ताहर (प्रो.सुमित कदम) आदिवासी प्रगती मंडळ संचालीत काॅ. गोदावरी शामराव परुळेकर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, तलासरी येथे रासेयो विभागाच्या वतीने आभासी पद्धतीने झुम अॅपवर  गुरुवार दि. 22 जुलै 2021ला  रासेयो स्वयंसेवकांसाठी एक दिवसीय उद्बोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख अतीथी म्हणुन प्रा. जगदिश संसारे, माजी रासेयो जिल्हा समन्वयक पालघर विभाग यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 

रासेयो म्हणजे काय? तीचा उगम, विकास, व्याप्ती व कार्यप्रणाली काय?   रासेयो ही विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकासात कशी लाभकारी आहे? रासेयोच्या माध्यमातुन राष्ट्राच्या सेवेच्या परमोच्च लाभाचे कसे वाटेकरी होता येईल?  स्वयंशीस्त, अनुशासन, वक्तशिरपणा, वेळेचे व्यवस्थापन, नेतृत्वगुणांची वाढ, न्युनगंडाचा -हास आणि आत्मविश्वासाची वृद्धी कशी साधता येईल? त्या सोबतच वार्षिक परिक्षेत 10 गुणांचा लाभ कसा करता येईल? या सारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांना मीळावीत हा या कार्यक्रमाच्या आयोजनामागील उद्देश होता.

काॅ. गोदावरी परुळेकर यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करुन या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. दिपक वाकडे यांनी आपल्या प्रास्ताविकात महाविद्यालयात रासेयोचे 2 युनीट कार्यरत असुन त्या मार्फत आंतरराष्ट्रिय योगा दिन, सामाजिक न्याय दिन, वृक्षारोपण, ग्रामस्वच्छता, महाविद्यालयीन परिसर स्वच्छता, श्रमदान, कापडी पिशव्या वितरण, अॅन्टी प्लॅस्टीक अभियान, रस्ते सुरक्षा मोहीम, महीला आत्मसंरक्षण, महीला आरोग्य तपासणी शिबीर, फीट इंडीया कॅम्पेन, वृक्षदिंडी, मतदार जनजागृती अभियान, अंधश्रद्धा निर्मुलन, कोरोना संक्रमण काळात मोफत मास्क व सॅनीटायझर वितरण, व लसिकरण जनजागृती इ. विवीध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात अशी माहीती दिली. या उपक्रमातुन विद्यार्थ्यांत सामाजिक उत्तरदायित्वाची विण पक्की होते असे प्रतिपादन त्यांनी केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. बी. ए. राजपुत यांनी आपल्या 12 वर्षे इतक्या प्रदिर्घ काळ रासेयो  कार्यक्रम अधिकारी म्हणुन केलेल्या कार्याला उजाळा देत त्यातुन आपल्या व्यक्तीमत्वाचा विकास कसा साध्य करता येतो यावर भाष्य केले. राष्ट्रिय सेवा योजना हि केंद्र शासनाने 24 सप्टेंबर 1969 ला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची शताब्दी जन्ममहोत्सवाला सुरू केली. शासनाच्या इतर योजना पुरेश्या नियोजन कौशल्या अभावी बारगळत असताना ही राष्ट्रिय सेवा योजना मात्र अजुनही कार्यप्रवण आहे कारण 'एकमेका साह्य करु अवघे धरु सुपंथ' या स्वयंसेवकांच्या आचरण वृत्तीमुळेच असे प्रतीपादन त्यांनी केले. रासेयो मुळे माणसे जोडली जातात, सामाजिक बांधीलकी निर्माण होते, सुप्त गुणांना वाव मीळतो असे प्रतीपादन त्यांनी केले. तसेच आपल्या प्राचार्य पदावर पोचण्यासाठीचे बहुतांशी श्रेयही  रासेयोचे असल्याचे त्यांनी सांगीतले.

कार्यक्रमाचे प्रमुख अतीथी प्रा. जगदिश संसारे यांनी राष्ट्रिय सेवा योजनेच्या विवीधांगी पैलुंवर प्रकाश टाकतानाच राष्ट्रिय सेवा योजना हे एक सेवाव्रत असल्याचे नमुद केले. रासेयो म्हणजे केवळ शिस्तीचा बडगा ही कल्पना आता कालबाह्य झाली असुन रासेयो स्वयंसेवकांनी जिवनाचा आनंद व जगण्याचा सुगंध लुटत हा खजीना हस्तगत करण्याचे आवाहन त्यांनी स्वयंसेवकांना केले. रासेयो मध्ये येणारा विद्यार्थी प्रारंभी 10 गुणांच्या लालसेने येत असला तरी या महासागरात त्याला इतर काही अशी रत्ने प्राप्त होतात की ज्यामुळे त्याचा सर्वांगीण विकास होतो. सात दिवसीय नीवासी शिबीर, जील्हा स्तरीय शिबीर, आव्हान कॅम्प, पथनाट्ये अशा विवीध उपक्रमांच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांच्या नेतृत्वगुणांचा विकास होतो व राष्ट्रिय स्तरावर देशाचे नेतृत्व करण्याची संधीही प्राप्त होते असेही त्यांनी प्रतीपादन केले. एक तास चाललेल्या मार्गदर्शनात त्यांच्या स्वरकौशल्य, अभिनय कौशल्य व ओघवत्या वक्तृत्व शैलीने त्यांनी विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभारप्रदर्शन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. दिपक वाकडे यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. रितेश रायचना यांनी करुन दिला. प्रा. रितेश हटकर यांनी तांत्रिक सहाय्य केले. या कार्यक्रमात काॅ. गोदावरी परुळेकर महाविद्यालय, तलासरी, सेंट जोसेफ काॅलेज, विरार, युनीव्हर्सल काॅलेज ऑफ इंजीनीयरींग इ. विवीध महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व सकारात्मक प्रतीसाद दिला.शेवटी राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!