पेंच व्याघ्र प्रकल्पात आंतरराष्ट्रीय रेंजर दिनाचे आयोजन

अनामित
पेंचव्याघ्र प्रकल्प, नागपूर यांच्या वतीने अमलतास निसर्ग निर्वाचन केंद्र, सिल्लारी  येथे रेंजर  दिन निमित्त क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचे चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले. या चर्चासत्रात पेंच व्याघ्र प्रकल्पातील सर्व वन परिक्षेत्रातील वन अधिकारी-कर्मचारी यांनी हिरीरीने भाग घेतला.

या चर्चा सत्रासाठी पेंच व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक डॉ. प्रभू नाथ शुक्ल हे अध्यक्ष म्हणून लाभले होते. कार्यक्रमाची प्रस्तावना करताना श्री. अतुल देवकर यांनी जगभर ३१ जुलै रोजी जागतिक रेंजर दिन साजरा केला जातो, जे वनकर्मचारी वन-वन्यजीव संरक्षण आणि संवर्धन कर्तव्य बजावत असताना शाहिद किंवा जखमी झालेले आहेत अश्या लोकांच्या बलिदानाची आठवण म्हणून आणि जगातील नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारशाचे रक्षण करण्यासाठी क्षेत्रीय वन अधिकारी -कर्मचारी करत असलेल्या कार्याचा गौरव करण्यासाठी हा दिवस साजरा करत असल्याचे सांगितले. जागतिक रेंजर संघटना  बाबत इतिहास, रेंजर्स दिवसाची २००७ ची सुरुवात, वर्ल्ड रेंजर काँग्रेस मधील सहभाग बाबत मार्गदर्शन केले. कोविड -19 साथीच्या काळात क्षेत्रीय वन अधिकारी-कर्मचारी यांच्याकडून केल्या गेलेल्या कार्याचा उचित सन्मान व्हावा हे या वर्षीच्या जागतिक रेंजर दिवसाचे विशेष प्रयोजन होते.
[ads id='ads1]
या चर्चासत्रामध्ये पेंच व्याघ्र प्रकल्पात नाविन्यपूर्ण कार्य करणाऱ्या विविध वनपाल आणि वनरक्षक यांनी आपल्या कामाचे सादरीकरण केले. यामध्ये वनपाल संजय परेकर यांनी संरक्षण कार्यात केलेले कार्य अधोरेखित केले. वनरक्षक रामदास नान्हे यांनी पेंच मधील सर्प जातीवर सादरीकरण केले. व्याघ्र सनियंत्रण यावर वनरक्षक प्रदीप गदळे यांनी सादरीकरण केले. विशेष व्याघ्र संरक्षण दलाच्या गजानन राऊत आणि इतर वनरक्षक यांनी जंगलातील रानभाज्या, औषधी वनस्पती, विविध पक्षी आणि अवैध मासेमारी वर केलेल्या कार्याबद्दल सादरीकरण केले. याचवेळी वनरक्षक कु. आम्रपाली पडघान आणि चेतन उमाटे यांनी अनुक्रमे पेंच मधील विविध फुलपाखरांच्या आणि अळिंबी प्रजातींच्या बद्दल उपस्थितांना माहिती दिली. वनरक्षक आकाश जाखल यांनी श्वान पथकाचे मागील 5 वर्षातील कार्याचा आलेख उपस्थितांसमोर मांडला.

पेंच मधील इतर वनरक्षक यांनी अशाचप्रकारे विविध महिती संकलित करून पेंच चा डेटा बेस तयार करावा अशी भूमिका  जागतिक रेंजर दिनाच्या सर्वाना शुभेच्छा देताना आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात डॉ. प्रभू नाथ शुक्ल यांनी मांडली. क्षेत्रीय वन कर्मचाऱ्यांनी पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या संरक्षण आणि संवर्धन क्षेत्रात केलेल्या कार्याचा गौरव केला आणि सर्वाना शुभेच्छा दिल्या. सदर चर्चा सत्राचे आयोजन पेंच व्याघ्र प्रकल्पातील वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. मंगेश ताटे, श्री. प्रियदर्शन बाभळे, श्री. विजय सूर्यवंशी आणि श्री. अनिल भगत यांनी केले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. ताटे यांनी केले तसेच उपस्थितांचे आभार वन परिक्षेत्र अधिकारी अनिल भगत यांनी मानले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!