मुक्ताईनगर वार्ताहर (प्रमोद कोंडे) शिवसेना पक्षप्रमुख तथा लोकप्रिय मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्ह्यातील रक्ताचा तुटवडा काही अंशी भरून काढण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुक्ताईनगर तालुका शिवसेनेच्यावतीने गण वाईज भव्य रक्तदान शिबीर दि.३१. जुलै शनिवार रोजी पार पडले.
[ads id='ads1]
दिवसभरात तालुक्यातून ९ ठिकाणच्या गण वाईज केंद्रांवर सुमारे ९५४ रक्तदात्यांनी रक्तदान केले. तर शेकडो रक्तदानासाठी आलेल्यांना नुकतेच लसीकरण झाल्यामुळे त्यांचे रक्त संकलित करण्यात आले नाही.
रक्तदान शिबीर यशस्वीतेसाठी तालुका प्रमुख छोटू भोई, विधानसभा क्षेत्रप्रमुख उपतालुका प्रमुख प्रफुल्ल पाटील , जिवराम कोळी, नवनीत पाटील, शिवाजी पाटील, शहर प्रमुख गणेश टोंगे, राजेंद्र हिवराळे ,शहर संघटक वसंत भलभले , नगरसेवक पियुष मोरे , मुकेशचंद्र वानखेडे , संतोष मराठे , आरिफ आझाद , नुरमोहम्मद खान , युनूस खान , जाफर अली, अफसर खान , शकुर जमादार, सलीम खान , मुशीर मणियार , युवा सेना जिल्हाप्रमुख पंकज राणे, उपजिल्हा प्रमुख पवन सोनवणे , कुऱ्हा पंकज पांडव , सतीश नागरे, नारायण पाटील, अविनाश वाढे, नरेंद्र गावंडे, प्रफुल कोळी, प्रमोद कोळी, दीपक वाघ, सुधीर कुलकर्णी , मोहन बेलदार , सुदीप बावस्कर, भागवत पाटील , मितेश पाटील , संदीप पाटील, ईश्वर पाटील , योगेश पाटील, पंकज कोळी, गोलू मुर्हे , विठ्ठल तळेले, राजेंद्र तळेले, गोपाळ सोनवणे, गणेश पाटील यांच्यासह असंख्य शिवसैनिक पदाधिकारी यांनी रक्तदान शिबीरात मेहनत घेतली.
मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा ,पारंबी,वढोदा,चिचखेडा बु ,अंतुर्ली ,चांगदेव, रुईखेडा, उचंदा, मुक्ताईनगर शहर अशा ९ ठिकाणी गण निहाय रक्त संकलन करण्यात आले. आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी सकाळी १०. वाजता मुक्ताईनगर येथील केंद्रावर रक्तदान केले व रक्तदान करण्याचे आवाहन केले.
शकुर जमादार व सलीम खान या दोघ जेष्ठ शिवसैनिकांनी मुस्लिम समाजात स्वतः फिरून उल्लेखनीय रक्तदाते रक्त संकलन केंद्रा पर्यंत आणले. यासाठी ते आवर्जून भ्रमणध्वनी वरून सर्वांना रक्त दानाची माहिती देऊन लोकांतील गैरसमज व अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न करीत होते. या दोघांच्या कार्याचे कौतुक सर्वांनाच वाटत होते.विशेष म्हणजे आमदार चंद्रकांत पाटील यांनी देखील या दोघांचे कौतुक केले.