रावेर प्रतिनिधी (राजेंद्र अटकाळे ) रावेर पंचायत समितीच्या सर्व सदस्यांच्या २०१६/२१ दरम्यान खर्च केलेल्या शेष फंडमधील भ्रष्टाचार झाला असुन याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी आज दिनांक २६ जुलै सोमवार रोजी निळे निशान सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद भाऊ बाविस्कर यांनी निवेदनाद्वारे गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल यांच्याकडे केली आहे.
रावेर पंचायत समिती सद्या तालुकाभरात प्रचंड चर्चेत आहे. निळे निशान सामाजिक संघटने तर्फे सन २०१६ ते सन २०२१ मध्ये पंचायत समिती सदस्य यांच्या शेष फंडची चौकशी करण्याची मागणी केली आहे. या फंडमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोपी निळे तिशाण सामाजिक संघटनेचे अध्यक्ष आनंद बाविस्कर यांनी केला असून त्यांनी आज गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल यांची भेट घेऊन चौकशीची मागणी केली
यामध्ये विविध योजनांच्या पात्र लाभार्थी यांचे नावे अंदाजपत्रक काम पूर्णत्वाचा दाखला मूल्यमापन नोंदची माहिती त्यांनी प्रशासनाला केली यावेळी त्यांच्या सोबत दादाराव सवर्णे बाळु निकम जब्बार शेख नजमुद्दीन शेख विजय धनगर नारायण सवर्णे चंद्रकांत गाढे पंकज कोळी सुधिर सैगमीरे आदी निळे निशान सामाजिक संघटने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.