नंदुरबार :सन 2021-2022 या शैक्षणिक वर्षांसाठी शासकीय तंत्रनिकेतन मौजे होळ तर्फे-हवेली नंदुरबार येथे विद्युत अभियांत्रिकी, संगणक अंभियांत्रिकी, यंत्र अभियांत्रिकी पदविका, तसेच स्थापत्य अभियांत्रिकी पदविका प्रवेश व नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
[ads id='ads1]
शासकीय तंत्रनिकेतन, नंदुरबार येथे स्थापत्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमास 60 विद्यार्थी क्षमतेसाठी भारतीय तंत्र शिक्षण परिषद नवी दिल्ली आणि उच्च व तंत्रशिक्षण विभाग मुंबई यांनी शैक्षणिक वर्ष 2021-2022 पासून मान्यता दिली आहे. तर विद्युत अभियांत्रिकी, संगणक अभियांत्रिकी आणि यंत्र अभियांत्रिकी पदविका हा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी यापूर्वीच मान्यता मिळाली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी नोंदणी प्रक्रीया पूर्ण करून प्रवेश प्रक्रीयेत सहभाग नोंदवावा आणि अधिक माहितीसाठी सुविधा केंद्र, शासकीय तंत्रनिकेतन, जगतापवाडी नंदुरबार येथे संपर्क साधावा असे प्राचार्य सुनीलकुमार अंधारे यांनी कळविले आहे.