पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी कक्षाची कारवाई ; जिल्हा ऑल आउट ऑपरेशन दरम्यान दोन फरारी आरोपी जेरबंद...

अनामित
पुणे : मा. पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्या आदेशान्वये रेकॉर्डवरील गुन्हेगार, फरार आरोपी, अवैध अग्निशस्त्र यांच्यावर कारवाई करणेकामी दि. ०८/०७/२०२१ रोजी पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये कोम्बिंग ऑपरेशन घेण्यात आले. या अनुषंगाने दहशतवाद विरोधी कक्ष पथकाचे चे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते हे आपल्या पथकासह गस्त करीत असताना दहशतवाद विरोधी कक्षाचे विशाल भोरडे व मोसिन शेख यांना मिळालेल्या बातमीनुसार पथकाने राजगड पोलीस स्टेशनच्या खुनाचा प्रयत्नाच्या गुन्ह्यातील फरारी असलेले आरोपी संकेत निवृत्ती खुडे वय २५ वर्ष व ऋषिकेश निवृत्ती खुडे वय २० वर्ष राहणार मोरवाडी तालुका भोर जिल्हा पुणे यांना नसरापुर परिसरातून ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई साठी राजगड पोलीस स्टेशनला सुपूर्द केले आहे. 
[ads id='ads1]
सदर कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी कक्षाचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विश्वास खरात, पोलीस हवालदार अब्दुल शेख, ईश्वर जाधव, पोलीस नाईक विशाल भोरडे, महेंद्र कोरवी, किरण कुसाळकर, मोसिन शेख, लक्ष्मण राऊत व अरुण पवार या पथकाने केली. सायबर पोलिस स्टेशनचे सुनिल कोळी व चेतन पाटील यांनी तांत्रिक मदत केली

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!