रावेर वार्ताहर (प्रमोद कोंडे) रावेर गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल यांच्या अध्यक्षतेखाली दि. २८/०७/२१ बुधवार रोजी पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या बैठकीत काम न करणाऱ्या ग्रामसेवकांना कडक शब्दात सुनावण्यात आले की आता
या पुढे कोणतेही कारणे चालणार नाहीत वेळेत केलेली कामे दाखवा. जे ग्रामसेवक कामे वेळेत करणार नाहीत त्यांना नोटीस बजावण्यात येणार आहे. ग्रामसेवकांच्या कामाची पाहणी व तपासणी केली जाईल असा ईशारा बैठकीत देण्यात आला.
[ads id='ads1]
स्वच्छ भारत मिशन ,आधार कार्ड अपडेट करणे, जॉब कार्ड मॉपिंग करणे,अपुर्ण घरकुले, ड ची यादी, करवसुली, या सह ग्रामपंचायतीच्या विविध योजनांचा या बैठकीत आढावा घेण्यात आला. या बैठकीला विविध विभागांचे प्रमुख अधिकारी, विस्तार अधिकारी सोनवणे, सधांशु व ग्रामसेवक उपस्थित होते.