स्वच्छ भारत मिशन अंतर्गत हागणदारीमुक्त ग्रामपंचायतीचे सातत्य टिकवण्यासाठी ग्रामपातळीवर गुडमाँर्निंग पथक राबविण्याचे आदेश...

अनामित
जळगांव वार्ताहर (प्रमोद कोंडे) स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत सन २०१८/२०१९ मध्ये जळगांव जिल्हा हागणदारीमुक्त म्हणुन घोषीत झाला असुन सद्या स्थितीत हागणदारी मुक्त टप्पा क्र.२ प्रभावीपणे राबविला जात आहे. म.मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.जळगांव यांनी १३/७ - १९/७/२०२१ रोजी झालेल्या सभेत दिलेल्या सुचनानुसार दि.२६/०७/२०२१ रोजी पत्रक काढले आहे.

या सुचनेनुसार वैयक्तीक शौचालय वापराचे सातत्य राखले जात नाही असे दिसुन येते असे निदर्शनास आलेले आहे . ही अत्यंत खेदजनक बाब असुन ग्रामपंचायत पातळीवर स्वच्छतेच्या सवयी ग्रामस्थांना लावणे हे आपले कर्तव्य आहेत.

तरी आपल्या स्तरावर गुडमाँर्निंग पथक राबवुन गावांत शाळेमार्फत फलकासह गावांत रँली काढुन रँलीमध्ये स्थानीक पदाधिकारी यांना सुध्दा सहभागी करुन जनजागृती रॅली दि.०२/०८/२०२१. रोजी आयोजीत करण्यात यावी.कोवीड १९ च्या सर्व अटीशर्तीला अधिन राहुन रँलीचे आयोजन करावे.असे तालुक्यातील सर्व शाळांना गटशिक्षण अधिकारी शिक्षण विभागातर्फे सुचीत करण्यात आले आहे.रँलीचे फोटोग्राफसह अहवाल कार्यालयास सादर करण्याचे परिपत्रक काढण्यात आले आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!