मांगलवाडी (वार्ताहर) ता.रावेर येथील ३५० घरांचे सम्पादन व पुनर्वसन करावे यासाठी लाक्षणिक उपोषणास बसण्याबाबत जिल्हाधिकारी आणि ज.म.प्र. वि.कार्यकारी अभियंता सो अदिती कुलकर्णी यांना दि २१/०६/२०२१ रोजी निवेदन देण्यात आले होते.
तापी नदीकाठावरील मांगलवाडी येथील तापी पाटबंधारे विकास महामंडळाची नियामक मंडळाची बैठक क्र.५० मध्ये ठराव क्र.५०.७ मध्ये उर्ध्व तापी टप्पा-१ (हतनूर) प्रकल्पा आंतर्गत मांगलवाडी येथील ३५० घरांचे सम्पादन व पुनर्वसन मान्य असून सदरचा खर्च जलसम्पदा विभागामार्फत करण्याकरिता सदरचे हमीपत्र असून सुद्धा याची दखल घेतली जात नाही गेल्या पंधरा वर्षापासून हा प्रश्न प्रलम्बित असून शासनस्तरावर सम्बंधित अधिकारी , माजी जलसंपदा मंत्री मा.गिरीश महाजन(आमदार), माजी जळगांव जिल्हा पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी मंत्री मा.एकनाथ खडसे, यांचेजवळ पाठपुरावा करूनही दखल घेतली गेलेली नाही.
गाव तिन्ही बाजूने बाराही महिने पाण्याने वेढलेले असते,नदीला पुराचे पाणी वाढल्यास,पावसाची झडी लागल्यास गावाची संपूर्ण जमीन ओलसर राहते. घरांमध्ये सर्दावा ( ओलावा) वाढून भिंतींना मीठासारखे पांढरे द्रव्य ( लोणी) लागते. घरातील फाशीवर घर पाझरल्यासारखे पाण्याचे थेंब येतात.अनेकांना उंचावर झोपावे लागते.जमीन खोदल्यास जमीनीखाली जवळच ८ ते १० फुटावर पाणी लागेल.पूराचे पाणी जास्त दिवस राहील्यास वा यावेळी भुकंपाने जमीन हलल्यास गाव जमीनीखाली जाण्याचा मोठा धोका आहे.
[ads id=ads1]
गावाच्या आजूबाजूला पाणी असल्याने सरपटणारे प्राण्यांपासून अनेकदा धोका निर्माण होतो.पुनर्वसनाच्या यादीत नाव असूनही शासनाकडून गावाला डावलले जात असल्याने गावाचे पुनर्वसनाचे काम त्वरित पूर्ण करावे अशी मागणी सर्व शक्ती सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रा. संजय मोरे, सर्व शक्ती सेना विद्यार्थी संघटना जळगाव जिल्हा अध्यक्ष कृष्णा सावळे यांचेसह मांगलवाडी ग्रामस्थांनी मा.भगत सिंह कोश्यारी ( राज्यपाल), मा.ना.उध्दव जी ठाकरे (मुख्यमंत्री) यांना दिनांक:- १९/०७/२०२१ रोजी निवेदन देण्यात आले आहे. शेवटी प्रा. संजय मोरे कृष्णा सावळे यांनी निवेदनाद्वारे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी केली आहे की, आमची मागणी एक महिन्यात पुर्ण न झाल्यास प्रा संजय मोरे सर्व शक्ती सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यांच्या नेतृत्वा खाली संपुर्ण महाराष्ट्रात आदोलन करण्यात येईल असे प्रा. संजय मोरे यांनी सांगितले आहे
मा.भगत सिंग कोशारी (राज्यपाल), मा.ना.उध्दव ठाकरे (मुख्यमंत्री) यांना निवेदन देताना प्रा.संजय मोरे सर्व शक्ती सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सर्व शक्ती सेना विद्यार्थी संघटना जळगाव जिल्हाध्यक्ष कृष्णा सावळे, सर्व शक्ती सेना विद्यार्थी संघटना जळगाव जिल्हा अध्यक्ष, किरण निजाई-सर्व शक्ती सेना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, किरण वैद्य-सर्व शक्ती सेना पालघर जिल्हा अध्यक्ष, लक्ष्मीबाई भोईर-सर्व शक्ती सेना महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष पालघर, बुध्दभुषण सावळे, जनार्दन मेहेर,नंदकुमार चौधरी ईत्यादि उपस्थित होते.