अंतुर्ली वार्ताहर (दिनेश जैस्वाल) कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता निस्वार्थी सेवा करणाऱ्या कोरोना योदधांचा गौरव राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम सर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुली॔ येथे करण्यात आला. कोरोना काळात आरोग्य विभागातील डॉक्टर, आरोग्य कर्मचारी व संरक्षण विभागातील पोलिस व पोलीस कर्मचारी तसेच ग्रामपंचायत स्टाफ, सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया स्टाफ यांनी कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता निस्वार्थ वृत्तीने सेवाभाव दाखविला .
[ads id='ads1]
यासाठी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या वतीने अंतुली॔ ता. मुक्ताईनगर येथे कोरोना योद्धयांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी आरोग्य विभागातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. प्रविण देशमुख(वैद्यकीय अधिकारी), डॉ. संदीप तायडे (वैद्यकीय अधिकारी), डॉ. युवराज बावस्कर (वैद्यकीय अधिकारी), सिंधु केदार (ए.एन.एम), नरेंद्र कडू घुले (फारमासिसट), डॉ.मनोज साहेबराव पाटील (वैद्यकीय अधिकारी), डॉ.दिलीप पांडुरंग बोरसे (वैद्यकीय अधिकारी), व पिंपरी नांदु येथील डॉ. युवराज एल. चौधरी (वैद्यकीय अधिकारी) व संरक्षण विभागातील पोलिस कॉन्स्टेबल संभाजी रघुनाथ बिजागरे, पोलिस नाईक उमेश गोविंदा महाजन, पोलिस कॉन्स्टेबल राहुल प्रकाश महाजन, पोलिस कॉन्स्टेबल संदीप जयचंद झरवाल, पोलिस कॉन्स्टेबल रविंद्र लिलाधर चौधरी, पोलिस कॉन्स्टेबल सुनील ममताजी नागरे, सहाय्यक फौजदार माणिक लक्ष्मण निकम, पोलिस नाईक गजमल माधवराव पाटील तसेच ग्रामपंचायत स्टाफ व सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया स्टाफ यांना कोरोना योद्धा प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे पत्रकार शाकीर शेख, अशोक देशमुख, किरण पाटील, योगेश पाटील, विठ्ठल धनगर,मनोज गवांदे उपस्थित होते.
शाकीर शेख