शिराळा मध्ये खवले मांजर वाचवण्यात प्लॅनेट अर्थ फाउंडेशन ला यश...

अनामित
वाळवा वार्ताहर(अ‍ॅड बसवराज होसगौडर) शिराळा वनपरिक्षेत्र हद्दीमध्ये दिनांक 15 जुलै 2021 रोजी रात्री खवले मांजर आढळले होते. प्लॅनेट अर्थ फाउंडेशनचे वाटेगाव येथील सर्पमित्र गणेश निकम यांना ग्रामस्थांनी कळवले. त्यानंतर त्यांनी ते खवले मांजराला सुखरूप रेस्क्यू करून वन विभागाला कळवून ते त्यांच्या ताब्यात घेतले.  त्यानंतर रात्री वनविभागाच्या स्टाफ ने खवले मांजर ताब्यात घेऊन नियमानुसार घटनास्थळ पंचनामा करून तसेच पशु वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून वैद्यकीय तपासणी करून निर्जन अशा सुयोग्य नैसर्गिक अधिवासात त्याला मुक्त केले. 
[ads id='ads1]
सदर खवले मांजर हे पूर्णपणे वाढ झालेले निरोगी तंदुरुस्त अशा स्थितीत होते. शिराळा तालुक्यातील पश्चिम आणि पूर्व भाग हा खवले मांजर चा अधिवास आहे. कोणत्याही नागरिकांना अशा प्रकारे खवले मांजर अथवा इतर वन्यजीव आढलले असता, त्यांनी तात्काळ वन विभाग अथवा प्लॅनेट अर्थ फाऊंडेशनच्या सदस्याला कळवावे. हे खवले मांजर नैसर्गिक अधिवासात सोडत असताना संस्थेचे सदस्य गणेश निकम, प्राणीमित्र मीनाक्षी गणेश निकम, संस्थेचे उपाध्यक्ष प्रणव महाजन सर, प्रोजेक्ट असिस्टंट प्रथमेश शिंदे, वनपाल सुरेश चरापले, वनरक्षक दिपाली सागावकर, अनिल पाटील, अंकुश खोत इत्यादी उपस्थित होते. सर्वांना वनक्षेत्रपाल सुशांत काळे सर यांचे मार्गदर्शन लाभले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!