गावातील मुख्य ठिकाणी सी सिटीव्ही कॅमेरा बसविण्याची गरज
पाल ता रावेर वार्ताहर (सुरेेेेश पवार) दि 14/07/2021 पाल परिसरात मागील दोन ते तीन वर्षा पासूनवाहन चोरीच्या प्रकारात वाढ झाली असून अक्षशा चोरीचा धुमाकुळच घातला आहे. बुधवार रात्री 11 वाजेच्या सुमारास बकरी ईद सणाच्या निमित्त पाल पोलीस तर्फे पाल पासून दोन किमी अंतरावर महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश सीमेवर व पोलीस हेड कॉस्टबल राजेंद्र राठोड ,संदीप धनगर रात्री चेकिंग करत असताना एका दुचाकी स्वारावर संसय आल्याने पोलिसातर्फे त्यास थांबवण्याचा प्रयत्न केले असता दुचाकी स्वारगाडी सोडून पसार झाला
[ads id='ads1]
पोलिसातर्फे पाठलाग करण्यात आला परंतु कोळोखं अंधाराचा फायदा घेत दुचाकी चोर जंगलाच्या मार्गाने पसार होण्यास यशस्वी झाला पाल पोलिसातर्फे दुचाकीला जप्त करण्यात आले असून अज्ञात वाहनचोर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले सहा महिण्यापूर्वी चोरी झालेली येथील रवींद्र लक्ष्मण राठोड यांची हिरो दिलक्ष गाडी ची सहामहिन्यापूर्वी घरासमोरून रात्रीच्या वेळी चोरी झाली होती त्या गाडीचा तपास पाल पोलिसांची मध्यप्रदेश राज्यात जाऊन सहा महिन्यात अथांग प्रयत्नातुन गाडी शोधून काढली गाडी तर मिळाली पण दुचाकी चोर घर सोडून पसार झाला आहे त्याचाही तपास पोलीस करत आहे
सी सी टीव्ही कॅमेरा बसविण्याची गरज
पाल हे गाव मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र राज्याच्या सीमेवरील शेवटचे व अतिदुर्गम भागातील गाव असल्याने महाराष्ट्रसह मध्यप्रदेश राज्यातील जवळपास 30 ते35 खेडे पाडे या गावाला लागून असून यागावाची मुख्य बाजारपेठ पाल आहे या निमित्ताने गावात येणे जाणे करणाऱ्याची संख्या मोठयाप्रमानावर असल्याने याचाच फायदा घेत चोर चोरी करण्यात यशस्वी होऊन जातो त्या बरोबर पाल परिसराचा विस्तार पाहता पोलिसांची संख्या ही कमी असल्याने व पोलिसांवरचा कामाचा ताण ही जास्त असल्याने याचाच फायदा चोरी करणारे घेत आहे या सर्व घटनेवर आळा घालण्यासाठी साठी गावातील मुख्य ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा लावल्यास गावातुन येणाऱ्या जाणाऱ्या वयक्तीवर नजर राहील आणि चोरीच्या घटनेवर आळा बसेल
स्टेटमेंट
गाव सह परीसरातील कायदा सुवेवस्था अबाधित राखणे हे ही महत्वाचे असून जवळच मध्यप्रदेश सीमा असल्याने या मार्गाने येणे जाणे करणाऱ्याची संख्या जास्त लागल्याने आमच्या तर्फे संशयितांची चौकची केली जाते परंतु सी सिटीव्ही कॅमेरा लावल्यास गुन्हेगारांवर नजर ठेवता येईल
राजेंद्र राठोड
पाल पोलीस हेड कॉन्स्टेबल
