सार्वजनिक बांधकाम विभागाचा लिपिक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात ; अडीच हजाराची लाच भोवली ...

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 रावेर (प्रमोद कोंडे) सेवानिवृत्तीची रक्कम अदा केल्याच्या बदल्यात अडीच हजाराची लाच मागणी करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कनिष्ठ लिपीकाला लाचलुचपत विभागाच्या पथकाने आज गुरुवारी दि. 15 रोजी दुपारी अटक केली आहे. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

तक्रारदार यांचे वडील रावेर येथील सार्वजनिक बांधकाम विभागातून सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या ग्रॅज्यूएटीची रक्कम ३ लाख ९१ हजार ७१० रूपये बँक खात्यात जमा करण्याच्या मोबदल्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ लिपीक शेख वसीम शेख फयाज - वय ३० राहणार मदिन कॉलनी रावेर याने रु.२०००,आणि अर्जीत रजेची येणारी रक्कत बँक खात्या जमा करण्यासाठी ५०० असे एकुण अडीच हजार रूपयाची लाचेची मागणी केली. ही मागणी संशयित आरोपीने पंचासमोर केली.

सापळा व मदत पथक

पर्यवेक्षण अधिकारी सतिष डी. भामरे,पो.उप.अधिक्षक अँन्टी करप्शन ब्युरो,जळगांव. पी.आय.संजोग बच्छाव, लोधी,स.फौ.दिनेशसिंग पाटील, पो.हे.काँ.अशोक अहीरे,सुनिल पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.काँ.रविंद्र घुगे, पो.ना.मनोज जोशी, सुनिल सिरसाठ, जनार्दन चौधरी,पो.काँ.प्रविण पाटील, नासिर देशमुख, ईश्वर धनगर, प्रदिप पोळ, महेश सोमवंशी,

 आरोपी कनिष्ठ लिपीक शेख वसीम शेख फयाज याला या लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने अटक केली आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!