SSC Result 2021: महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या दहावीच्या निकालाची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे शुक्रवारी दुपारी राज्यातील सर्व सरकारी आणि खासगी शाळांच्या निकालाची घोषणा होणार आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी निकालाबाबतची माहिती दिली आहे.
दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 16 लाख 4 हजार 441 विद्यार्थी उपस्थित होते. करोना पार्श्वभूमीवर परीक्षा रद्द झाल्याने मूल्यांकन पद्धतीनुसार हा निकाल लागणार आहे. यापैकी साधारण 15 लाख 92 हजार 418 हून अधिक विद्यार्थ्यांचे गुण कॉम्प्युटर सिस्टीममध्ये अपलोड करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
कोरोना पार्श्वभूमीवर राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता सरसकटपणे उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानंतर या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अंतर्गत गुण आणि त्यांच्या मूल्यमापन संदर्भात 10 जूनपासून शाळा स्तरावर कार्यवाहीला सुरुवात झाली होती. ही कार्यवाही ३ जुलै पर्यंत पूर्ण करून राज्य शिक्षण मंडळाकडून दहावीचा निकाल 15 जुलै पर्यंत जाहीर केला जाणार होता. आता एक दिवस उशीरा निकाल जाहीर होणार आहे.,
महत्त्वाची सूचना:
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) July 15, 2021
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला इ.१०वीचा ऑनलाईन निकाल उद्या दि.१६ जुलै,२०२१ रोजी दु.१:००वा. जाहीर होईल.सर्व विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा!#SSC #results @CMOMaharashtra pic.twitter.com/q8dKHn1PDv

