रावेर वार्ताहर (प्रमोद कोंडे) नगर पालिका सभेत सोलर पँनल बसविण्याबाबत ठराव मंजुर झाल्यावर याबाबत टेंडर काढण्यात आले.व त्यानुसार एका सोलर ग्रिड कनेक्टर बसविणा-या कंपनीस हे काम देण्यात आले असुन वैशिष्टपुर्ण योजनेतुन हे काम करण्यात येत असुन नगर पालिकेच्या इमारतीवर ग्रिड कनेक्टर सोलर बसविण्यात येणार आहे.
[ads id='ads1]
संपुर्ण नगर पालिकेचा असणारा विज पुरवठा सोलर पँनलच्या माध्यमातुन होईल यामुळे नगर पालिकेचा वर्षाकाठी होणारा विज बिलावरील लाखोंरुपयांचा खर्च वाचणार असुन बचत होणार आहे.
ग्रिड कनेक्टर सोलर पँनल मुळे विजेच्या बाबतीत सावदा नगर पालिका स्वंयपुर्ण होणार असुन लाखोंरुपये विज बिल बचत होणार असुन स्वत: विज निर्मिती करणारी सावदा नगर पालिका ही बहुधा जळगांव जिल्ह्यातील पहिलीच पालिका असेल असे मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी सांगितले.