या अनुषंगाने जिल्हा वैद्यकीय तसेच जिल्हा प्रशासन नेहमी कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करतांना दिसून येते मात्र रावेर आरोग्य यंत्रणा यांचे पालन करत नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. तर शासकीय रावेर ग्रामीण रुग्णालय याठिकाणी कोरोना टेस्ट (COVID-19 test) आणि डॉक्टर (doctor) कक्षाच्या मागील भागात खिडकीच्या भागात फोटोत दाखवल्याप्रमाणे औषधींच्या बिनकामच्या आणि दारुच्या खाली बाटल्या ह्या पडुन आहे. [ads id='ads1]
इतकेच नाही तर चक्क लज्जास्पद बाब म्हणजे त्यांच ठिकाणी दारुचच्या बाटल्या देखील पडुन आहेच यातुन स्पष्ट होते रुग्णालयात नक्कीच मद्य प्रेमी असतील. शासकीय ग्रामीण रुग्णालयातील ह्या असल्या प्रकाराकडे कोण लक्ष देईल. इतक्यावरच नाही तर तिथेच सर्जिकल मास्क तुटलेल्या अवस्थेत वापरले इंजेक्शन कीट्स औंषध बाटल्या ह्या अपुर्ण जाळलेल्या अवस्थेत पडुनच आहे.
रावेर ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात प्लास्टिक जाळणे हे प्रदुषण निर्माण करणे तसेच या गोष्टींन कडे संबंधित प्रशासनाचे स्पष्ट दुर्लक्षकेल्याचे दिसुन येत आहे ह्या दारुचा बाटल्या मधुनच दिसते की आता गाव नाही तर रावेर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय कीती स्वच्छ आहे हे अधिकार्यांनी बघणे गरजेचे आहे.
रावेर तालुक्यातील आरोग्य अधिकार्यांना स्वच्छता राखायची कशी यांचे धडे शिकवणे गरजेचे तर वेसनमुक्ती केंद्र गावागावात करण्या आधी रावेर ग्रामीण रुग्णालयात करणे गरजेचे आहे या सर्व वृत्तांची दखल प्रशासकीय यंत्रणेने घ्यावी अशी मागणी सामन्य जनतेतुन केली जात आहे. कोरोना कक्षाच्या बाहेरील परिसरात देखील स्वच्छता करण्याची गरज येथे आहे.. नाहीतर या पावसाळ्यात डास गावात नाही रावेर ग्रामीण रुग्णालयात तयार होतील...