मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र सरकारचे (Maharashtra Government) पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) आजपासून मुंबईमध्ये सकाळी 11 वाजता सुरू होत आहे. या अधिवेशनामध्ये विरोधक वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन सरकारवर टीका करतील तर दुसरीकडे विरोधकांच्या टीकेवर महाविकासआघाडी त्यावर जसे च्या तसे उत्तर देते का ? हे पाहणे आता उत्सुकतेचे असेल यावर आता सर्वांचे लक्ष लागून आहे. अवघ्या दोन दिवसाच्या पावसाळी अधिवेशनात पहिल्या दिवशी विरोधक आक्रमक पवित्रा घेत सरकारची कोंडी करतील, असं समजत आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची शक्यता जवळपास कमी असल्याने लक्षवेधी तारांकित प्रश्न -उत्तरेदेखील नसणार आहेत. यामुळे विरोधक सरकारच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतील.
राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था, सध्याच्या कोरोना संकटात लोकांचे झालेले हालमराठा आरक्षण, ओबीसी राजकीय आरक्षण रद्द झाले आहे अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर राज्य सरकारची कोंडी विरोधक करतील असे बोलले जात आहे. तर दुसरीकडे ED च्या माध्यमातून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून तिसरे समन्स मिळाले आहे. सर्वोच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी देशमुख प्रयत्न करत आहेत. देशमुख यांच्या मुद्द्यावरूनदेखील विधिमंडळामध्ये पडसाद उमटण्याची शक्यता आहे.


