▪️सोलापूर मराठा आक्रोश मोर्चा : कडेकोट पोलीस बंदोबस्तात सोलापूरमध्ये मराठा आक्रोश मोर्चा, नरेंद्र पाटील म्हणाले, पुढचा मोर्चा प्रशासनाला न सांगता काढणार..
▪️शिवसेनेसोबत कोणतंही शत्रूत्व नाही, जर-तरला अर्थ नसतो, परिस्थितीनुसार निर्णय घेऊ; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान. शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप आमदार आशिष शेलार यांच्या गुप्त बैठकीनंतर चर्चांना उधाण.
▪️Maharashtra Monsoon Session: दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनाची उद्यापासून रणधुमाळी, 'या' मुद्द्यावरुन वादळी ठरणार अधिवेशन! विधिमंडळ अधिवेशनासाठी करण्यात आलेल्या कोरोना चाचणीतील 4 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह.
▪️'सुनो सुनो ए दुनियावालों, ये वायरस घर ढूंढ़ रहा है...अमिताभ बच्चन यांनी कोरोनावर लिहिली कविता, चाहत्यांना केलं सतर्क.
▪️कोविशिल्डच्या दुसऱ्या डोसनंतरही 16 टक्के लोकांमध्ये Delta Variant विरोधात अॅन्टिबॉडी नाही, ICMR चा खुलासा. Covaxin डीलची चौकशी करा, ब्राझिलच्या सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राष्ट्रपती बोलसोनारो यांच्या समोरील अडचणी वाढल्या.
▪️हवामान बदलामुळे शेतीवर विपरीत परिणाम; सोयाबीन, कापूस, गहू आणि हरभऱ्याचे मोठे नुकसान, इन्स्टिट्यूट ऑफ सस्टेनेबल कम्युनिटीजचा अहवाल..
▪️देशातील दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत घट, गेल्या 24 तासांमध्ये 43 हजार कोरोनाबाधितांची नोंद. राज्यात शनिवारी 8,395 रुग्ण बरे होऊन घरी, 9,489 नव्या रुग्णांची नोंद, मालेगावात शून्य तर कोल्हापुरात सर्वाधिक..
▪️MPSC मायाजाल' म्हणत मुख्य परीक्षा पास तरुणाची पुण्यात आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लिहिलं धक्कादायक कारण. एमपीएससीचा ढिसाळपणा विद्यार्थ्यांच्या जीवावर उठलाय?
▪️ऑनलाईन तलवारी मागून त्याची विक्री करणाऱ्याला औरंगाबाद पोलिसांकडून बेड्या. त्याच्या ताब्यातून तब्बल 41 तलवारी, दोन गुप्ती आणि सहा कुकरी पोलिसांकडून जप्त.
▪️खाटीमा विधानसभा आमदार पुष्कर सिंह धामी यांनी उत्तराखंडच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. धामी उत्तराखंडचे ११वे मुख्यमंत्री. राज्यपाल बेबी रानी मौर्य यांनी दिली मुख्यमंत्री पदाची शपथ.
▪️अॅमेझॉन कंपनीच्या सीईओ पदाचा जेफ बेझोस उद्या (ता.5) राजीनामा देणार. जेफ बेझोस यांची जागा अॅमेझॉनच्या क्लाउड कम्प्यूटिंग बिझनेसचे संचालन करणारे अँडी जेसी जागा घेणार.
▪️महाविकास आघाडी सरकारची 16 महिन्यात जाहिरातबाजीवर तब्बल 155 कोटी उधळपट्टी! माहिती अधिकारात आली समोर माहिती. जवळपास 5.99 कोटी रुपये सोशल मीडियावर खर्च.
▪️'झुंड' सिनेमात अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करणाऱ्या अभिनेत्यास पोलिसांनी ठोकल्या बेड्या. शानशाैक पुर्ण करण्यासाठी चोरीकडे वळला आणि लोहमार्ग पोलिसांच्या तावडीत सापडला. प्रियांशु उर्फ बाबु रवी क्षेत्री (२०) रा. मेकोसाबाग असे या अभिनेत्याचे नाव आहे.
▪️शेतकरी आंदोलन आता संसदेच्या दारात पोहोचणार, २२ जुलैपासून शेतकरी शक्तिप्रदर्शन करणार. केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात रोज सुमारे २०० शेतकरी आंदोलन करणार
✒️ स्वप्निल लोणकर आत्महत्या: एमपीएससी परीक्षांसंदर्भात राज्य सरकार समिती गठित करणार, समिती अभ्यास करून सरकारला अहवाल देणार; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
✒️ जम्मू-काश्मीर: श्रीनगरमध्ये ड्रोनच्या विक्री आणि खरेदीवर बंदी; ज्यांच्याकडे ड्रोन आहेत त्यांना ते पोलिस ठाण्यात जमा करावे लागणार
✒️ महाराष्ट्रात 1,23,225 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 58,48,693 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 1,23,030 रुग्णांचा मृत्यू
✒️ हिंदू-मुस्लीम वेगळे नाहीत; आपण लोकशाही देशात राहतो, सर्व भारतीयांचा डीएनए एकच : सरसंघचालक मोहन भागवत
✒️ ठाकरे सरकारचा 16 महिन्यांत प्रसिद्धीवर 155 कोटी खर्च; माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने दिली माहिती
✒️ भारतात 4,77,019 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 2,96,92,986 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 4,02,758 रुग्णांचा मृत्यू
✒️ पॅरिस: तिरंदाजी वर्ल्डकपमध्ये दीपिका कुमारीने भारतासाठी तीन सुवर्णपदके जिंकली; झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन दीपिका कुमारीला देणार 50 लाखांचं पारितोषिक
✒️ मॉन्सून: 8 ते 9 जुलैपर्यंत पावसाचं कमबॅक; राज्यात सर्वदूर पाऊस असेल, कोकणात पावसाचा आणखी जोर वाढणार
✒️ केंद्रीय तपास यंत्रणांवर कोणताही राजकीय दबाव नाही, उच्च न्यायालयाच्या आदेशानेच चौकशी; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले स्पष्ट
✒️ जळगावात कर्जबाजारी सलून व्यवसायिकाची आत्महत्या, लॉकडाऊन काळात सलून बंद झाल्याने आर्थिक कोंडी; पैसे परत मागणाऱ्यांचा तगादा सुरू झाल्याने जीवन संपवलं