रावेर (प्रमोद कोंडे) रावेर तालुक्यातील तांदलवाडी- बलवाडी रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झुडपे व गवत वाढले असून, वाहनधारकांच्या चकमकी होत असतात.त्यामुळे ही काटेरी झुडपे काढण्याची मागणी वाहनधारकांकडून होत आहे.तांदलवाडी बलवाडी या ५ कि.मी.अंतर असलेल्या रस्त्यावर दोन्ही बाजूंनी काटेरी झुडपे व गवत मोठया प्रमाणात वाढले आहे.या रस्त्याने शेतकऱ्यांचा व वाहनधारकांचा मोठा वापर असून केळीची ट्रकद्वारे याच रस्त्याने वाहतूक केली जाते.
[ads id='ads1]
आधीच रस्ता अरुंद असून काटेरी झुडपे रस्त्यात आल्याने अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे समोरून येणारी वाहने दिसत नाहीत.सदरचा रस्ता हा रावेर शहराला जाण्या येण्यासाठी मुख्य रस्ता आहे.त्यामुळे मोठया प्रमाणात लहान मोठी अवजड वाहने या रस्त्यावरून जात असून वाढलेल्या काटेरी झुडपांमुळे समोरून येणारी वाहने दिसत नाहीत.
[ads id='ads2]
तसेच साईड देण्यास जागा शिल्लक राहत नसल्याने अनेक वेळा किरकोळ स्वरूपाचे अपघात होत असतात. आजूबाजूच्या गावातील केळी व्यापारी,शेतमजूर यासह प्रवासी वाहने, वाहनधारक या रस्त्याने निंभोरा, खिर्डी, ऐनपूर यासह अनेक गावांना जा- ये करत असतात. त्यामुळे वाहनांची वर्दळ सुरूच असते.परिणामी वाढलेल्या काटेरी झुडपांमुळे वाहनधारकांना अडचणी येत असून अपघाताचा धोकाही वाढला आहे.या झुुडपांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.