चोपडा (वार्ताहर) वर्डी ता चोपडा परिसरातील राम तलाव परिसरात दुपारी तीन वाजेच्या सुमारास विमान अपघात झाला होता. त्यात पायलट नूर अल अमीन यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर महिला सहपायलट अंशिका लखन गुजर या गंभीर जखमी झाल्या होत्या. वर्डी येथिल रमेश बारेला सर्व प्रथम तेथे पोहोचले होते आणि मदत कार्य सुरु केले होते मदत कार्य पोहचायला उशीरच झाला. या मदत कार्यात अगोदर पोहचलेला रमेश बारेला, सुमन्या बारेला, राजाराम, बिसन, एकनाथ, सैराम, विक्की यांच्या धाडसाचे कौतुक होत आहे. पहाडात जखमी अंशीकाला आणण्यासाठी समय सुचकता दाखवत त्यांनी पहाडात सर्रास वापरली जाणारी पेशंटला नेण्याची बांम्बूलेन्स साड्यांची झोळी बनवून तीन किलो मीटरवरच्या अँम्बूलेन्सपर्यंत आणले. अंशिकाचा जीव वाचविण्यात त्यांचे मोठे योगदान आहे हे विसरता येणार नाही
[ads id='ads1]
ते व त्यांचे इतर सहकारी सुमन्या बारेला,राजाराम बारेला, बिसन बारेला,एकनाथ बारेला, साईराम बारेला यांनी मदत करुन साळीची झोळी करून, बांबुलन्स तयार करून अंशिकाला अंबुलन्स पर्यंत आणून तिचा जीव वाचवण्यासाठी पर्यंत्न केले होते.
[ads id='ads2]
रमेश बारेला व इतर सहकारी यांचा शासनाने यथायोग्य सत्कार व सन्मान करून रमेश बारेला यांचे नाव शौर्य पुरस्कार साठी केंद्र शासनाना कडे पाठवावे. अशी मागणी अनेर काठ संघर्ष आणि निर्माण समिती चे संयोजक प्रा. प्रदीप लिंबा पाटील (घोडगाव) यांनी एका प्रसिद्धी पत्रका द्वारे केली आहे.