शासनाच्या आरक्षण विरोधी धोरणाच्या विरोधात रावेर येथे राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने बोंबाबोंब आंदोलन व रॅली प्रदर्षण करुन दिले तहसीलदारांना निवेदन...

अनामित
रावेर : ७मे २०२१ च्या शासन निर्णयाच्या विरोधात राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघ आयोजित चार चरणामध्ये आंदोलनाचा तिसरा टप्पा म्हणुन दि.१९ जुलै २०२१ रोजी संपुर्ण महाराष्ट्रासह रावेर येथे राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या मार्फत पोलिस स्टेशन पासून तहसील कार्यालयापर्यंत कर्मचारी व सहयोगी समविचारी संघठनांद्वारे रॅली प्रदर्षण करण्यात आले
[ads id='ads1]
७मे २०२१चा शासनादेश रद्द करा,शिक्षणाचे खाजगीकरण-रद्द करा ,कर्मचार्यांची जुनी पेंशन योजना चालु करा,कामगार विरोधी कायदे- रद्द करा,शेतकरी विरोधी कायदे -रद्द करा,नौकरभर्ती-चालु करा, प्रतिनिधित्व बचाओ-लोकतंत्र बचाओ,आरक्षण बचाओ-लोकतंत्र बचाओ......अशा प्रकारच्या घोषणा रॅली मध्ये देण्यात आल्या,,त्यानंतर , तहसील आवारामध्ये सरकारच्या देशविरोधी धोरणांच्या विरोधात बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले व सर्वांच्या वतीने मा.नायब तहसीलदार पवार साहेब यांना निवेदन सादर करण्यात आले.

   प्रोटाॅन शिक्षक संघटनेचे रावेर तालुकाध्यक्ष व राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघ या ट्रेड युनियन चे अधिकृत पदाधिकारी मा.उमेशजी दांडगे सर यांचे नेतृत्त्वाखाली हे आंदोलन करण्यात आले,प्रसंगी या आंदोलनांमध्ये मा.दिलीप पाटील सर,मा.प्रकाश महाजन सर (केंद्र प्रमुख),मा.हर्षवर्धन तायडे सर (ग्रेडेड मुख्याध्यापक),मा.निलेश पाटील सर,मा महेंद्र लोंढे सर (बामसेफ तालुकाध्यक्ष रावेर),मा.सुरेश चिमणकारे सर,मा.कैलास घोलाणे सर,मा.राहुल अवसरमल,मा सायबु तडवी,मा.विशाल सनेर सर,मा.नितिन गाढे सर (जिल्हाध्यक्ष, भारत मुक्ती मोर्चा जळगांव),मा.बापु सोनवणे सर,मा.विशाल तायडे सर,मा.सिद्धार्थ तायडे सर,मा.सचिन सोनवणे सर,राजु तायडे सर,मा.अक्षय नाना तायडे सर व इतर बहुजन बांधव उपस्थित होते, पोलिस निरिक्षक मा.वाकोडे सर यांचे पोलिस सहकार्यांच्या सहकार्याने व कोविड-१९च्या सर्व नियमांचे पालन करून हे आंदोलन यशस्वीरित्या संपन्न करण्यात आले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!