भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या सुवर्ण जयंती वर्षानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न..

अनामित
जळगाव - भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा हा विभाग 16 जुलै, 2021 रोजी 50 वा वर्धापन दिन सुवर्ण जयंती महोत्सव म्हणून साजरा करीत आहे. या दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती डॉ अनुपमा पाटील, वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रण, जळगाव यांनी दिली आहे. 
[ads id='ads1]
  भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, महाराष्ट्र राज्य, पुण्याचे संचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांचे मार्गदर्शनातून भुजल साक्षरता अभियान वेबिनारव्दारे राज्यभर विविध गटांसाठी आयोजित करण्यात आले होते. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातही डॉ. अनुपमा पाटील, वरिष्ठ भुवैज्ञानिक यांचे मार्गदर्शनाखाली विविध शाखेतील विद्यार्थी (B.SC, M.SC, GEOLOGY, GEOGRAPHY, AGRICULTRE) ग्रामपचांयतस्तरीय अधिकारी, पदाधिकारी, कृषि विभाग इत्यादी विविध गटांसाठी 33 वेबिनाराचे आयोजन करण्यात आले होते. या वेबिनारमध्ये भुजल संवर्धन, भुजल पुर्नभरण, भुजल गुणवत्ता, पाण्याचा ताळेबंद याबाबत तज्ञांमार्फत मार्गदर्शन करण्यात आले. या वेबिनारमध्ये जिल्ह्यातून 4 हजार विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन आपला प्रतिसाद नोंदविला. 
[ads id='ads2]
रक्तदान शिबीर संपन्न
  भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचा 50 वा वर्धापन दिन सुवर्ण जयंती महोत्सव दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त 14 जुलै, 2021 रोजी कार्यालयाच्या जळगाव जिल्हा प्रयोग शाळेतील आवारात रक्तदान शिबीराचे आयोजन वरिष्ठ भुवैज्ञानिक डॉ. अनुपमा पाटील यांचे उपस्थितीत करण्यात आले होते. हे रक्तदान शिबिर लोकमत वृत्तपत्र समुह व इंडियन रेडक्रास सोसायटीच्या सहकार्याने घेण्यात आले. या रक्तदान शिबीरात कार्यालयातील 15 रक्तदात्यांनी रक्तदान केल्याचे डॉ. अनुपमा पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!