रावेर (प्रमोद कोंडे) निंभोरा बु।। ता.रावेर येथील वाघोदा रोड कार्नर वरील ग्रामपंचायत गाव दरवाज्या समोरील जुने कोरडे झालेल्या पिंपळाच्या झाडामुळे आजुबाजुच्या रहीवाशांना , व्यावसायीकांना , पादचा-यांना , मोठा धोका निर्माण झाला आहे.
दोन तीन वर्षापासुन पिंपळाच्या जिर्ण झाडाकडे निंभोरा ग्रामपंचायत प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी लहान मोठ्या व्यावसायीकांच्या टप-या तसेच दुकाने आहेत . व जवळुन विजेच्या ताराही खालुन गेलेल्या आहेत. तारांमुळे शॉर्टसर्किट होण्याची, तसेच झाड पडल्यास जिवीतहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
निंभोरा बु. ग्रामपंचायतीच्या गावदरवाज्याजवळ मेन रोड लगत असलेल्या या जिर्ण पिंपळाच्या झाडामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागे याच झाडाची एक फांदी टपरीवर तुटुन पडली आहे. ग्रामपंचायत प्रशासन सांगूनही दुर्लक्ष करीत आहे. निंभोरा बु.गावाचे नवनिर्वाचित सरपंच सचिन महाले यांनी याकडे लक्ष देऊन त्वरीत हे जिर्ण पिंपळाचे झाड तोडण्याविषयी कार्यवाही करावी.अशी मागणी निंभोरा ग्रामस्थांनी केली आहे.