Faijpur : प्रांतधिकारी यांनी रावेर तहसीलदार यांना रावेर पुरवठा विभागातील कथित भ्रष्ट्राचार प्रकरणी आठ दिवसात मागितला लेखी खुलासा ...

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

प्रांतधिकारी यांनी रावेर तहसीलदार यांना रावेर पुरवठा विभागातील कथित भ्रष्ट्राचार प्रकरणी आठ दिवसात मागितला  लेखी खुलासा ...

रावेर (प्रमोद कोंडे) जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या आदेशावरुन रावेर तहसील मधील पुरवठा विभागाची दोन महीन्यांपासुन फैजपुरचे प्रांतधिकारी कैलास कडलग चौकशी करत आहे.तालुक्यातील रेशन दुकानदारांचे लेखी खुलासे या प्रकरणात घेण्यात आले आहेत.

 रावेर पुरवठा विभागात शासकीय अर्जात परस्पर बदल करणे, अनुमती नसताना अर्ज छापून विक्री ,राजमुद्रा असलेला तहसीलदारांच्या शिक्क्याचा गैरवापर तसेच प्रति कार्ड ३ रुपयेप्रमाणे छापलेल्या अर्जांची विक्री यासह इतर कारणांवरुन येथील तत्कालीन पुरवठा अधिकारी यांचेवर आरोप आहे.

Raver तहसील पुरवठा विभागातील कथित भष्ट्राचार प्रकरणात प्रांतधिकारी कैलास कडलक यांनी रावेरच्या तहसीलदार उषाराणी देवगुणे यांना याबाबत पुढच्या आठ दिवसात लेखी खुलासा मागितला आहे.याबाबतचे पत्र रावेर तहसील कार्यालयाला Faijpur प्रांत ऑफीस कडुन प्राप्त झाले आहे.या आठ दिवसाच्या खुलाशात काय निष्पन्न होते, या कारवाई कडे तालुका वासीयांचे लक्ष लागून आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!