रावेर यावल शेतक-यांच्या बचत खात्यावर पिक विम्याची रक्कम जमा होणे बाबत कृषी मंत्री यांना प्रहार जनशक्ती पक्षा तर्फे निवेदन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 रावेर प्रतिनिधी (राजेंद्र अटकाळे)

        दि. २७ जुलै मंगळवार रोजी सकाळी नाशिक येथे कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य नामदार. श्री.दादाजी भुसे साहेब यांची भेट घेऊन रावेर यावल मतदारसंघा सह मुक्ताईनगर भागातील पिक विम्याची रक्कम न देणा-या बँकांवर गुन्हा दाखल करुन शेतक-यांच्या बचत खात्यावर पिक विम्याची रक्कम जमा होणेबाबत प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिलभाऊ चौधरी व पदाधिकारी यांनी निवेदन दिले.

           याबाबत सकारात्मक भूमिका आदरणीय कृषी मंत्री महोदयांनी घेतली. लवकरात लवकर शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावू असे सुद्धा आश्वासन दिले. दादाजी भुसे साहेब यांनी कृषी अधिकारी ठाकूर साहेब यांना कॉलच्या माध्यमातून सांगितले तात्काळ निर्णय घ्यावा असे आदेश दिले.

       यावेळी निवेदन देतांना प्रहार जनशक्ती पक्ष अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र अनिलभाऊ छबिलदास चौधरी, व प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते निवेदन देतांना उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!