सावदा येथील झुलेलाल बायोडिझेल पंप तहसिलदार यांचे आदेशाने झाले सील

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

रावेर प्रतिनिधी (राजेंद्र अटकाळे)

   रावेर तालुक्यातिल सावदा येथे बायोडिझेल पंप सुरु करण्यासाठी पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाने लागू केलेले ना हरकत दाखले , प्रमाणपत्र मुदतीत सादर न करू शकल्याने रावेर तहसीलदार उषाराणी देवगुणे  यांच्या आदेशानुसार फैजपूर रोड वरील डायमंड ट्रान्सपोर्ट मागील झुलेलाल बायोडिझेल पंप सील करण्यात आला . पुरवठा निरीक्षक रावेर व मंडळ अधिकारी सावदा यांनी २३ जुलै २०२१ रोजी रावेर तहसीलदार यांना झुलेलाल बायोडिझेल पंप तपासून तपासणी अहवाल सादर केला होता .


     या तपासणीत बायोडिझेल साठवणूक विक्रीसाठी विविध विभागांकडून आवश्यक नाहरकत दाखला , प्रमाणपत्रे पंप चालकाने सादर केल्या नसल्याचे नमूद करण्यात आले होते .  

     यानुसार पंप चालकाला हे सर्व ११ कागदपत्रे २६ जुलै रोजी रावेर  तहसीलदारांसमोर सादर करण्याबाबत नोटीस बजावण्यात आली होती . मात्र , पंप चालक असे  ११ नाहरकत दाखले , प्रमाणपत्र यापैकी एकही दाखला , कागदपत्र सादर करू न शकल्याने झुलेलाल बायोडिझेल पंप अवैधरीत्या सुरु असल्याचे तहसीलदारांच्या लक्षात  आले . तहसीलदारांनी पुरवठा निरीक्षक रावेर व मंडळ अधिकारी सावदा यांना निरज खेमचंद जसवाणी यांच्या मालकीचा सावदा येथील डायमंड ट्रान्सपोर्टच्या मागे असलेला झुलेलाल बायोडिझेल पंप पंचनामा करून तात्काळ सील करण्याचे आदेश दिले होते . सील उघडून विक्री होतांना आढळून आल्याने पंप चालका विरोधात गुन्हा दाखल करण्याचे तहसीलदारांनी आदेशात म्हटले  आहे .


#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!