पुणे - वंचित बहुजन आघाडी पुणे जिल्हाध्यक्ष व शिरूर येथील नगरसेवक माननीय विनोद भालेराव यांना करोना काळात केलेल्या कामाचा लेखाजोखा पाहून त्यांना सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंट सन्मानित केले महाराष्ट्रातून विनोद भालेराव हे दुसरे नगरसेवक आहेत की त्यांना वर्ल्ड रेकॉर्ड ने सन्मानित करण्यात आले
सदर जागतिक उपक्रमात नगरसेवक माननीय विनोद भालेराव यांचे कार्य देखील नोंदवल्या गेले आहे वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड महाराष्ट्र उपाध्यक्ष मा.मेहबूब सय्यद,वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड होल्डर आदम सय्यद, मराठी चित्रपट निर्माते सिकंद सय्यद यांच्या हस्ते पुणे येथे त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला या पुरस्कारामुळे वंचित बहुजन आघाडी चे सर्व आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते आनंद व्यक्त करत असून माननीय विनोद भालेराव त्यांचे अभिनंदन होत आहे.