नवापूर प्रतिनिधी (प्रकाश खैरनार) येथील श्रीमती पी.ए.सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल नवापूर यांच्या वतीने किलवणपाडा येथे जाऊन गावातील पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना सोशल डिस्टनसींगचे पालन करून अध्यापन करून शिक्षण आपल्या दारी हा उपक्रम साजरा करण्यात आला.
[ads id='ads1]
सर्वप्रथम शाळेच्या प्रांगणात गावाचे सरपंच श्री राहुल गावित व सदस्य लाजरस गावित, शाळेचे मुख्याध्यापक एम एस वाघ, उपमुख्याध्यापक एम जे सोनवणे व उपस्थित शिक्षक व ग्रामस्थांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. अमोल दिवटे यांनी कोरोना प्रादुर्भावापासून कसा बचाव करावा तसेच घरी राहून शाळेचे महत्त्व व अभ्यास कसा करावा यासंदर्भात माहिती दिली.
[ads id='ads2]
त्यानंतर इयत्ता पाचवी, सहावी, सातवी ,आठवी व नववी असे वेगवेगळे वर्ग तयार करून सर्व विद्यार्थ्यांना अध्यापन करण्यात आले. मराठी विषयाचे अध्यापन अनिल वळवी यांनी केले हिंदी विषयाचे अध्यापन अमोल दिवटे यांनी केले , इंग्रजी विषयाचे अध्यापन शुभांनी भालेराव यांनी तर गणित विषयाचे अध्यापन प्रतिभा पवार यांनी केले, इतिहास या विषयाचे अध्यापन निलेश पाटील यांनी केले तसेच विज्ञान या विषयाचे अध्यापन सोनू गावित यांनी करून मुलांमध्ये नवचैतन्य निर्माण केले.शाळा सुटल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना सोनू गावित यांनी खिचडी बनवून स्वतःच्या खर्चाने विद्यार्थ्यांना देण्यात आले.