चोपडा (सुवर्ण दिप वृत्तसेवा) तालुक्याती वर्डी शिवारात हेलिकॉप्टर दुर्घटनेत. दोन जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर महिला पायलट गंभीर जखमी आहे. चोपडा तालुक्यातील वर्डी शिवार असलेल्या सातपुडा पर्वत रांगेतील राम तलाव परिसरात हेलिकॉप्टर अपघातात झाल्याची घटना घडली असता हा परिसर सातपुडा पर्वत रांगेत असून, आदिवासी परिसर आहे घनदाट जंगलाचा परिसर आहे. घटनास्थळी पोहचण्यासाठी तीन किलोमीटर पायी जावे लागत असल्याने प्रशासनाची देखील तात्काळ मदत मिळणे कठीण आहे.
[ads id='ads1]
दुर्घटना दुपारी चारच्या सुमारास झाली आहे. दुर्घटना झालेले हेलिकॉप्टर आहे की प्रशिक्षणार्थींचे विमान होते ही माहिती अद्याप अस्पष्ट आहे. मात्र हेलिकॉप्टर असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात असून, यात दोन जणांचा मृत्यू झाला. महिला पायलट गंभीर जखमी आहे. आदिवासी परिसर असल्याने येथील आदिवासी बांधवांनी हेलिकॉप्टरमधील जखमी महिला पायलटला बाहेर काढून उपचारासाठी दवाखान्यात हलविले..