पाल ता रावेर वार्ताहर (सुरेश पवार)दिनांक १६ जुलै २०२१ शुक्रवार रोजी आत्मनिर्भर भारत अभियान अंतर्गत स्वतंत्र भारत अमृत महोत्सव व भारतीय कृषी अनुसंधान परिषद च्या ९३ व्या वर्धापनदिनानिमित्त कृषी विज्ञान केंद्र पाल यांनी ई- किसान गोष्टी कार्यक्रम आयोजित केला होता.
[ads id='ads1]
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ विजय महाजन, वरीष्ठ शास्त्रज्ञ, राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन केंद्र, राजगुरुनगर, पुणे हे होते. यावेळी डॉ विजय महाजन यांनी कमी खर्च व जास्त उत्पादन घेण्यासाठी ठिबक सिंचनाचा प्रभावी वापर करावा अणि को- ऑपरेटिव्ह फार्मिंग च्या माध्यमातून शेतकऱ्यांनी प्रगतीचा मार्ग शोधावा असे प्रतिपादन केले.
डॉ श्रीधर देसले, प्राध्यापक, कृषी महाविद्यालय, धुळे यांनी खरीप कांदा व्यवस्थापन, कांदा रोपवाटिका तयारी, रोग व कीड नियंत्रण तसेच कांदा बिजोत्पादन या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.
[ads id='ads2]
प्रमुख पाहुणे श्री. संभाजी ठाकूर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव यांनी कृषी संलग्न व्यवसाय, जैविक कीटकनाशकांचा प्रभावी वापर तसेच शेतकऱ्यांना उपयुक्त शासकीय योजना विषयी माहीती तसेच मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला शेतकरी, विद्यार्थी, महिला, कृषी निविष्ठा विक्रेता मोठ्या संख्येने ऑनलाइन उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री महेश महाजन यांनी तर सूत्रसंचालन डॉ धिरज नेहेते, कृषी विज्ञान केंद्र पाल यांनी केले.
