रावेर-(सुवर्ण दिप वृृत्तसेवा) महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी बोर्ड परिक्षेचा निकाल काल दि १६ जुलै २०२१ वेळ १ :०० वाजेच्या सुमारास जाहीर झाला होतो तर काही तांत्रिक अडचणी मुळे निकाल बघण्यास विद्यार्थ्यांना अडचणी होत होती मात्र काही तासानंतर वेबसाईटमध्ये सुधारणा झाली असुन विद्यार्थ्यांना निकाल बघता येत आहे
[ads id='ads1]
तर यंदा जळगाव जिल्ह्यातील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा लालमाती ता. रावेर इयत्ता १० वी बोर्ड परिक्षा निकाल सन :-२०२०-२१
प्रविष्ट विद्यार्थी : २१
विशेष प्राविण्य : १५
प्रथम श्रेणी :०६ शाळेचा निकाल :- १००% लागला आहे.अश्या प्रकारे १० वी बोर्ड परीक्षेत आदिवासी विकास विभाग यावल प्रकल्पातील शासकीय माध्यमिक आश्रम शाळा लालामती सह ६ शाळेंचा निकाल १०० % टक्के लागला असून गुणवंतांचे आदिवासी विकास विभाग नाशिक यावल प्रकल्प अधिकारी विनिता सोनावणे याच्या मार्गदर्शना खाली मुख्याध्यापक श्री मनीष तडवी सर (लालमाती)आणि समस्त शिक्षक वृदांकडून गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या
