रावेर (प्रमोद कोंडे) रावेर येथील सरदार जी हॉयस्कुलच्या जिमखाना हॉल मध्ये शिवसेनेची शिवसंपर्क अभियान बाबत बैठक आयोजित करण्यात आली. शिवसेना पक्षप्रमुख तथा Maharashtra Chief Minister मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्यभरात शिवसंपर्क अभियानास सुरुवात झाली. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री या नात्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे जनतेच्या हितासाठी करीत असलेले कार्य व जनतेच्या आरोग्य रक्षणासाठी घेत असलेले विविध निर्णय आणि या बाबत जनतेचे प्रबोधन या शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
[ads id='ads1]
या शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून राज्यशासनाने घेतलेले अनेक लोकहिताचे निर्णय जनतेपर्यत पोहचविणे,कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रिक्षा चालक,पथविक्रेते यांच्यासाठी जाहीर केलेल्या योजनेचा लाभ मिळाला का याची माहिती घेणे व त्यातील अडचणी दूर करणे,स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात आलेले धान्य पात्र शिधापत्रिका धारकांना मिळण्याबाबत तक्रारींचे निराकरण करणे,महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ मिळण्यातील अडचणी जाणून घेणे,याच बरोबर राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती सामान्य जनतेला देणे व त्याबाबत अडचणी दूर करणे हा या शिवसंर्पक अभियानाचा हेतू असल्याचे सांगितले. तर गाव तिथे शिवसेनेची शाखा आणि घर तेथे शिवसैनिक हे आपले ध्येय असल्याचे ही त्यांनी सांगितले. यासाठी मोठ्या संख्येने सदस्य नोंदणी करणे महत्वाचे आहे. त्यामुळे संघटनेचा विस्तार वाढण्यास मदत होईल.
या शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक शिवसेना शाखा प्रमुख व शिवसैनिक त्या त्या भागातील नागरिकांच्या घरोघरी जाऊन सामान्य जनतेच्या समस्या जाणून घेत त्या सोडविण्यासाठी आग्रही भूमिका घेत ठोस प्रयत्न करतील आगामी निवडणुकीत शिवसेना सामान्य जनतेच्या पाठबळावर मोठे यश संपादन करेल असा विश्वास व्यक्त करुन रावेर लोकसभा संपर्क प्रमुख विलास पारकर यांनी मार्गदर्शन केले., महाविकास आघाडी सरकारच्या जास्तीत-जास्त योजना सर्व-साधारण जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम करा, आवाहन उपस्थित शिवसैनिकांना दिले. विधानसभा संपर्क प्रमुख मोहन मंसुरकर यांनी केले.
[ads id='ads2]
माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनीही आपले मनोगत व्यक्त करुन मार्गदर्शन केले. " सत्तेसाठी मित्र म्हणुन ३५ वर्ष शिवसेनेचा वापर केला,व विश्वासघात केला,अशा लोकांना धडा शिकविण्याची वेळ आली आहे, मतदार संघात संघटन वाढवा, म्हणजे आपणास रावेरची विधानसभेची जागेवर आपल्या हक्काची मागणी करता येईल, यासाठी सदस्य वाढवा, संपर्क ठेवा."
यावेळी प्रहार संघटनेत गेलेले शिवसैनिक प्रविण चौधरी शिवसेनेत परत आले. त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी बैठकीला लोकसभा संपर्क प्रमुख विलास पारकर, विधानसभा संपर्क प्रमुख मोहन मसूरकर, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, यावल बाजार समिती सभापती मुन्ना पाटील, शिवसेना जिल्हा उपप्रमुख प्रल्हाद महाजन, शिवसेना तालुका प्रमुख योगिराज पाटील, शिवसेना उपजिल्हा संघटक रविंद्र पवार, अशोक शिंदे, कन्हैया गणवाणी,युवासेना शहरप्रमुख राकेश घोरपडे,युवा सेना तालुकाप्रमुख प्रविण पंडित,भानुदास चोपडे,महिला शहर संघटक बबली महाजन,कल्पना महाजन यांच्यासह अनेक शिवसेना पदाधिकारी , शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन अशोक शिंदे यांनी केले.


