सुवर्ण दिप
हेडलाईन्स, 17 जुलै 2021
▪️राज्य शासनाचे शासकीय कर्मचारी, तसेच जिल्हा परिषदेंतर्गत आजमितीस 2 लाखांपेक्षा अधिक पदे रिक्त. माहिती अधिकार कायद्याच ही बाब उघड. एकूण 29 पैकी या रिक्त पदांत 16 विभागांची माहिती अद्ययावत नसल्याचेही समोर.
▪️रिलायन्स रिटेल वेंचर्स लिमिटेडची 'जस्ट डायल लिमिटेड'चे अधिग्रहण करण्याची घोषणा. 'जस्ट डायल'च्या 40.95 टक्के भागभांडवलासाठी कंपनी 3,497 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार. कंपनी 26 टक्क्यांच्या समभागांसाठी खुली ऑफर घेऊन येणार.
▪️पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक,ओडिसा, महाराष्ट्र आणि केरळ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी कोविडबाबतच्या परिस्थितीवर चर्चा. महाराष्ट्र आणि केरळमधील वाढत्या रुग्णसंख्येवर व्यक्त केली चिंता.
▪️फोर्डच्या ग्राहकांना धक्का, कंपनी भारतीय मॅन्युफॅक्चरिंग ऑपरेशन्स बंद करण्याच्या विचारात. मरायमलाई नगर व सानंद येथील उत्पादन वर्षाअखेरीत बंद करणार असल्याची चर्चा.
▪️लोकांना घाबरवण्यासाठीच ईडीचा वापर; नोटीस आलेले घाबरलेत, असा गैरसमज करून घेऊ नका. मला ईडीची भिती वाट्ण्याचा प्रश्नच नाही : जयंत पाटील यांचे प्रतिपादन
▪️झायडस कॅडिलानं १२ ते १८ वर्षे वयोगटासाठी डीएनएवर आधारित असलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या क्लिनिकल ट्रायल पूर्ण केल्या. ही लस लवकरच उपलब्ध होणार असल्याचे मोदी सरकारचे दिल्ली उच्च न्यायालयात शपथपत्र
▪️पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगाव बायपासचं काम पूर्ण, पुणे-नाशिक प्रवास होणार सुस्साट, गडकरींची ट्विट करत माहिती. समृद्धी महामार्गाचे कामही प्रगतीपथावर..
▪️पुण्यातील पुरंदर तालुक्यातील नीरा येथील कुप्रसिद्ध गुंड गणेश रासकर याच्यावर अज्ञात व्यक्तींकडून गोळीबार. गोळीबारानंतर हल्लेखोर पसार. घटनास्थळी बघ्यांची गर्दी.
▪️भारत-चीन सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रिय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शरद पवार व ए.के.अँटनी यांच्याशी चर्चा केली. पवार आणि अँटनी या दोघांनीही काही वर्षांपूवी संरक्षणमंत्रिपद भूषविले आहे.
▪️इम्रान खान म्हणतात भारत-पाकिस्तान मैत्रीत संघाचा अडथळा. भारतासोबत मैत्रीचे संबंध व्हावेत, अशी आमचीही इच्छा; मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीचा त्यात अडथळा येतोय.
▪️विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्त्या 8 महिन्यांपासून प्रलंबित. मुंबई उच्च न्यायालयाने प्रश्न उपस्थित करत केंद्र सरकारला सोमवारपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.


