रावेर प्रतिनिंधी (राजेंद्र अटकाळे) सातपुडयाच्या पायथ्याशी वसलेल्या रावेर तालुक्यातील पाल या आदिवासी परिसरात भक्ति , प्रेम तथा ज्ञाना ची अविरत गंगा प्रगट करणारे ब्रम्हलीन परम पूज्य सद्गुरु संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी च्या श्री वृंदावन धाम पाल आश्रमात समाधि दर्शनाकरिता गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्त देशभरातून दरवर्षी अंदाजे पन्नास हजाराच्या वर चैतन्य साधक परिवाराची मांदियाळी होती.
[ads id='ads1]
परंतु मागील वर्षापासून कोरोना या महामारीच्या संसर्गा मुळे यंदा ही येणाऱ्या 23 जुलै चे गुरुपौर्णिमा महोत्सव कार्यक्रम शासनाच्या आदेशाचे पालन करीत रद्द करण्यात येत आहेत.असे अखिल भारतीय चैतन्य साधक परिवार रावेर तालुका समिति सह आश्रमाचे विद्यमान गादीपति श्रधेय संत श्री गोपाल चैतन्य जी महाराज यांचे तर्फे आवाहन करण्यात आले असून यंदा ची गुरुपौर्णिमा सुद्धा मागील वर्षाप्रमाणे साधकानी आपापल्या घरिच साजरी करावी तसेच पाल आश्रमातून सोशल मीडिया च्या माध्यमातून परम पूज्य सद्गुरु बापूजी समाधी दर्शन लाईव प्रसारण दाखविन्यात येणार असून कोणतेही भाविकानी गुरुपौर्णिमा च्या दिवशी पाल आश्रमात न येता फेसबुक , यूट्यूब च्या सहायाने घरिच ऑनलाइन दर्शनाचा लाभ घ्यावा असे ही सांगण्यात आले.
