यावल तालुक्यासह जिल्ह्यातून सर्वस्तरातून अभिनंदन
यावल :प्रतिनिधी (सुुरेश पाटील) तालुक्यातील नायगाव येथील तसेच महाराष्ट्र निवड मंडळ सदस्य स्वर्गीय गुणवंतराव भास्करराव पाटील यांचे सुपुत्र प्रसन्न गुणवंतराव देशमुख यांची उत्तर महाराष्ट्र समन्वयकपदी तर उत्तरमहाराष्ट्र जळगाव विभाग उपाध्यक्षपदी तालुक्यातील कोरपावली येथील अजय रामकृष्ण बडे यांची नियुक्ती अखिल भारतीय काँग्रेस कमिटी दिल्ली यांचेकडून दि.2जुलै 2021शुक्रवार रोजी करण्यात आली.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटी दिल्ली यांचे कडून नाशिक विभागासाठी महाराष्ट्र प्रदेश असंघटीत कामगार काँग्रेस यांचे साठी आणि संघटन मजबूत करण्यासाठी या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
त्यांना या बद्दल आमदार शिरीष चौधरी, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष संदीप पाटील,महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आबासाहेब पाटील (बाविस्कर) महाराष्ट्र काँग्रेस सरचिटणीस विनायकरावजी देशमुख, खान्देश काँग्रेस समन्वयक योगेंद्रसिंह पाटील, जिल्हाअध्यक्ष गणेश बारसे, कार्याध्यक्ष फय्याज हुसैन, यावल तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रभाकर सोनवणे, उपाध्यक्ष अनिल जंजाळे, इटकचे भगतसिंग बापू पाटील. पंचायत समिती गटनेते शेखर पाटील,कृउबा चे माजी उपसभापती दिलीप पाटील,गिरीश वसंतराव देशामुख जिल्हा सहकार बोर्ड माजी सदस्य विजयकुमार पाटील,जुगल घारू, उल्हास नेमाडे, संदीप सोनवणे, कदिर खान, अॅड नितीन चौधरी, अॅड देवेंद्र बाविस्कर,अॅड लोंढे,चंद्रकलाताई इंगळे, सौ.मनीषाताई पाचपांडे, सौ.पवारताई, सौ.प्रेरणा भंगाळे,मदिना तडवी, समाधान पाटील यांनी अभिंनदन केले आहे.



