यावल प्रतिनिधी (सुरेश पाटील)नगर परिषदच्या कार्यक्षेत्रातील विविध कामांसाठी पक्के रस्ते तोडण्यात आलेल्या रस्त्यांवर सर्वत्र चिखलाचे साम्राज्य झाल्याने पादचाऱ्यांपासुन तर वाहनधारकांना आपली वाहने चालविण्यासाठी तारेवरची मोठी कसरत करावी लागत असल्याने नगरपरिषदेच्या या दुर्लक्षित कारभारामुळे नागरीकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे
[ads id='ads1]
दरम्यान यावल नगरपरिषदच्या माध्यमातुन मागील एक वर्षापासुन शहरातील विस्तारित कार्यक्षेत्रातील नविन वसाहती मधील गंगानगर,पांडुरंग सराफ नगर, फालकनगर, चांद नगर, पवननगर,आयशा नगर आदी ठीकाणी विविध विकास कामांच्या नांवाखाली पक्के रस्ते तोडुन गटारी व नविन जलकुंभातुन होणाऱ्या पाणीपुरवठयासाठी जलवाहीनीसाठी मोठया पाईपलाईन टाकण्यात आली व यासाठी पाईप लाईन टाकताना डांबरीकरणाचे रस्ते हे मध्य भागातुन खोदण्यात आलीत पाईप लाईन टाकल्यानंतर ठेकेदाराने पाईप लाईन वर माती व्यवस्थित न टाकल्याने काळी माती रस्त्यावर विखुरलेली आहे पर्यायी रस्त्यावर मोठमोठे खड्डे आणि गतिरोधक निर्माण झालेली आहे त्यामुळे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात चिखल झाला आहे
डांबरीकरणाचे रस्ते खोदल्याने तात्काळ दुरुस्ती व्हावी तसेच आदी प्रलंबीत विकास कामांसाठी त्वरित नगर परिषदव्दारे करण्यात यावी या मागणीसाठी आयशानगर मधील सामाजीक कार्यकर्ते अशपाक शाह यांनी आपल्या काही सहकार्यांसह यावल नगरपरिषद समोर आमरण उपोषण केले होते त्या उपोषणाची सांगता नगराध्यक्ष सौ.नौशाद मुबारक तडवी यांच्या आश्वासनानंतर विस्तारित क्षेत्रातील वसाहतीमधील विकासकामे व समस्या तात्काळ सोडवु असे आश्वासन देण्यात आले होते,
[ads id='ads2]
मात्र या उपोषणाच्या दरम्यान दिलेल्या आश्वासनाची नगराध्यक्ष सौ.नौशाद तडवी यांनी आपला शब्द पाळला नसल्याचे सांगुन संपुर्ण पावसाळयात नागरीकांना अनेक संकटांना सामोरे जावे लागणार असुन या संदर्भात लक्ष केन्द्रीत होवुन समस्यांचे निराकरण व्हावे यासाठी आपण जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार असल्याचे अशपाक शाह यांनी सांगीतले आहे.
वरील भागातील रस्त्याची कामांबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव मंजुरीसाठी प्रलंबित असून येत्या आठ दिवसात ती मंजुरी मिळणार असल्याने लवकरच कामे होतील असे नगराध्यक्षा तडवी यांनी सांगितले.

