रावेर.( प्रमोद कोंडे.)राष्ट्रीय दलित पँथर चा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात जळगाव मिराई लाॅन येथे साजरा करण्यात आला.वर्धापन दिना निमित्त संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब भालेराव यांच्या मार्गदर्शनाणे गरीब, गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व गणवेश वाटप करण्यात आले.त्याप्रसंगी जळगाव जिल्हाध्यक्ष सुदाम सोनवणे,युवा जिल्हाध्यक्ष राजू तायडे,प्रदेश सरचिटणीस सिद्धार्थ सोनवणे,महिला जिल्हाध्यक्ष वैशाली हेरोळे , महा नगराध्यक्ष संजय जी निकम,आरपीआयचे महानगराध्यक्ष मिलिंद भाई सोनवणे,युवा जिल्हाध्यक्ष मोहन अढंगे,दादाराव हेरोळे,तालुका अध्यक्ष श्रावण सोनवणे,विलास बोरिकर, तालुकाध्यक्ष सुनील रायमोळे,महिला सदस्य महिला जिल्हा सरचिटणीस संगीता दैया,महिला सदस्य प्रतिभा सोनवणे, महिला सदस्य संगीता मोरे, बन्सीलाल राजपूत भगवान पाटील,अनिल अढंगे, मिलिंद भालेराव यासह असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
