सुवर्ण दिप
हेडलाईन्स, 10 जुलै 2021
▪️स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिवसेनेची 12 ते 24 जुलैपर्यंत 'शिवसंपर्क मोहीम', प्रत्येक मतदार संघातून प्रश्नावली भरून घेतली जाणार. प्रत्येक निवडणुकीची रननिती ठरवली जाणार.
▪️India vs Sri Lanka, Series Postponed : श्रीलंका संघात कोरोनाचा शिरकाव! वनडे आणि टी 20 सीरिजच्या शेड्यूलमध्ये बदल. श्रीलंकेचे फलंदाज प्रशिक्षक ग्रन्ट फ्लावर, परफॉर्मन्स विश्लेषक शिरांथा निरोशन यांना कोरोनाची लागण.
▪️राज्यातील कोविडमुक्त ग्रामीण भागातील पहिल्या टप्प्यात इयत्ता 8 वी ते 12 वीचे वर्ग 15 जुलैपासून सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर. पालकांच्या सूचना, अभिप्राय, मत जाणून घेण्यासाठी शिक्षण विभाग सर्वेक्षण करणार.
▪️राज्य शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक वर्षी एप्रिल, मे महिन्यात बदल्या होतात. मात्र राज्यात कोरोना पुर्णपणे आटोक्यात आलेला नसल्याने राज्य सरकारने यंदाच्या वर्षी बदल्या न करण्याचा निर्णय.
▪️दिलासा! राज्यात २४ तासांत १० हजार ४५८ जण कोरोनामुक्त; रिकव्हरी रेट ९६.०८ टक्क्यांवर. एकूण ८ हजार ९९२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद. २०० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू.
▪️धक्कादायक! आवडत्या डीएमके पक्षाच्या विजयासाठी देवाला केला नवस. विधानसभा निवडणुकीत विजय झाल्यानंतर एकाची मंदिरासमोर आत्महत्या करून देहत्याग. तमिळनाडूच्या करूर जिल्ह्यामध्ये प्रकार.
▪️जलसंपदा विभागाचे प्रकल्प विहित काळात पूर्ण होण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवावा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. जलसंपदा विभागाच्या विविध प्रकल्पासंदर्भात 'वर्षा' शासकीय निवासस्थानी बैठक
▪️मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी लसीकरण बंद, पालिका, सरकारी केंद्रांमध्ये शनिवारी लस नाही. शनिवारी ८५ हजार लसींचा साठा मुंबईला मिळण्याची शक्यता. सोमवारपासून लसीकरण मोहीम पुन्हा सुरू होईल शकेल.
▪️टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने यंदाच्या आर्थिक वर्षात ४० हजाराहून अधिक फ्रेशर्सना महाविद्यालयाच्या कॅम्पसच्या माध्यमातून नोकरीची संधी देण्याचा निर्णय घेतला.
▪️कोरोनाची दुसरी लाट संपण्यापूर्वी शाळा सुरू होण्यास सुरुवात झाली, बिहारनंतर हरियाणा आणि गुजरातने निर्णय घेतला. केवळ 50 टक्के विद्यार्थ्यांना कँप्समध्ये प्रवेश.
▪️नीटची परीक्षा 5 सप्टेंबरला होणार नाही, व्हायरल नोटीस खोटी, लवकरच येईल परीक्षेच्या तारखेचा निर्णय. भागधारकांशी सल्लामसलत करून नीट परीक्षेची तारीख निश्चित केली जाईल.
▪️फायजर, मॉडर्नाची लस दिल्यानंतर कोरोना संसर्गाची शक्यता 91 टक्क्यांपर्यंत कमी. न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात स्पष्ट.


